Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन्यास मान्यता ; कोरोना विरोधी लढ्यास मिळणार गती ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणीला यश
जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन्यास मान्यता ; कोरोना विरोधी लढ्यास मिळणार गती ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणीला यश
जळगाव प्रतिनिधी:जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी यापूर्वी पुणे, औरंगाबाद, धुळे येथे पाठवावे लागत होते. त्यातच जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन 7 एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून पार पडलेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील रूग्णांची तातडीने तपासणी होण्यासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी लॅबची मागणी केली होती. पालकमंत्र्यांची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लगेचच तत्वत: मान्य केली होती व लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय महाविद्यालयाने परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन तो शासनास सादर केला होता.
त्यानुसार शासनाने हा प्रस्ताव मान्य केला असून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे कार्यासन अधिकारी अ. मु. डहाळे यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक यांना पत्राद्वारे कळविले आहे की, या विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील सहा शासकीय रूग्णालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह बारामती, कोल्हापूर, गोंदिया, नांदेड आणि आंबेजोगाई (जि. बीड) येथे आता कोविड-19 तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) स्थापन करण्यास मान्यता प्रदान केली आहे. कोरोना चाचणीसाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी संस्थेस (राज्ययोजनेतंर्गत/जिल्हा वार्षीक योजना, स्वीय प्रपंची खाते व महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत उपलब्ध निधी इ.) उपलब्ध होणाऱ्या निधीतून करावा असे म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रयोगशाळेसाठी लागणारी आवश्यक सामग्री ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने व शिफारशीनुसार करण्यात यावी असेही म्हटले आहे.
कोरोना चाचणीची सुविधा जळगावात उपलब्ध झाल्यामुळे आता जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी धुळे, औरंगाबाद येथे न पाठविता जिल्ह्यातच रूग्णांचे निदान करता येणार असल्याने वेळ वाचणार असून निदान झाल्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. जळगावातच कोरोनाची चाचणी उपलब्ध झाल्याने कोरोना विरोधी लढ्यास चांगले बळ मिळणार असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा