Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर येथे तिन दिवसा पुर्वी चोरीच्या घटनेतील ७ संशयितांना शिरपूर पोलिसांनी काल दि १५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शिताफीने अटक केली
शिरपूर येथे तिन दिवसा पुर्वी चोरीच्या घटनेतील ७ संशयितांना शिरपूर पोलिसांनी काल दि १५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शिताफीने अटक केली
शिरपूर प्रतिनिधी शिरपूर येथे तिन दिवसा पुर्वी चोरीच्या घटनेतील ७ संशयितांना शिरपूर पोलिसांनी काल दि १५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शिताफीने अटक केली.
शिरपूर शहरातील अजंदे शिवारातील तापी अँग्रो फँक्ट्री लगत दि १२ एप्रिल रोजी चोरीची घटना घडली होती.यात फिर्यादी नलसिमराव पेंडमालकोंडाईया वेडमपुड्डी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि १२ रोजी राहत्या घरी खिडकीचा दरवाजा उघडून घरातील ६ हजार किंमीतीचे सोन्याचे कानातले तिन ऐक हजार ५० रूपये किंमतीचे पायातले चांदीचे बेले साडेतीन भार, बाराशे रूपये किंमतीचे पायातले चांदीचे कडे १ जोड,पंधराशे रूपये किंमतीचे कंबरेतील चांदीची चैन५ भार वजनाचे,बाराशे रूपये किंमतीचे कंबरेतील चांदीची चैन व ५ हजार किंमतीचे चलती रोख नोटा चोरी झाल्याची घटना घडली होती यामुळे ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आली होती.
याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास सुरु होता.अखेर शिरपूर शहर पोलिसांनी दहिवद गावातील टेक भिलाटी येथून रात्री बाराच्या सुमारास १)गबर्या उर्फ गबरु उत्तम मोरे,२)धर्मा सत्तरसिंग मोरे वय ३०,३)राजू मोहाड्या उर्फ हंसराज शिवराम भिल वय ४१,४)काश्या उर्फ काशिराम पुना पावरा वय १९,५)आनंद फुला पावरा वय ३०,६)भैय्यु रामसिंग पावरा वय १९,७)मंगल जयसिंग भिल वय २० रा.भिलाटी दहिवद ता शिरपूर यां ७ संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले आहे.शिरपूर पोलीस स्टेशनचे उमेश पाटील,नरेंद्र शिंदे,योगेश कोळी,बापुजी पाटील, स्वप्नील बांगर,प्रविण गोसावी,मुज्जेहादीन शेख,अमित रणमाळे आदींनी ही कारवाई केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा