Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० एप्रिल, २०२०

धुळे शहर व जिल्ह्यातील नागरिकांनो घराबाहेर मोटरसायकल किंवा चारचाकी घेऊन जाताय..! तर हे नियम लक्षात ठेवा…,



धुळे प्रतिनिधी आता या पुढे धुळे शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर वाहनावर जायचे असणार तर हा नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर.एम.उपासे यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आले आहेत.ज्यात म्हटले की, सेवा पुरवणारे शासकीय अधिकारी कर्मचारी, अत्यावश्यक साधन सामुग्री वाहतूक करणारे वाहनधारक यांना त्यांच्या कडील आवश्यक पुरावे पडताळून सध्या स्थितीत अत्यआवश्यक सुविधा सुरु करणे आवश्यक आहे.त्या द्रुष्टीने वैद्यकीय सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी, महसूल विभाग व शासकीय दैनंदिन कामकाजासाठी जाणारे सरकारी कर्मचारी वर्ग व इतर अत्यआवश्यक औषधी व साहित्य घेण्यासाठी जाणारे सामान्य नागरिकांनी घराबाहेर पडतांना मोटार सायकलीवर फक्त चालक व चारचाकी वाहनाचा उपयोग केल्यास चालक व मागील बाजुस फक्त एक इसम यांनीच प्रवास करावा.धुळे शहरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे जे वाहन धारक व नागरिक या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्या विरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भादवी कलम १८८ अन्वये कायदेशीर करण्यात येईल अशी आदेशाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध