Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० एप्रिल, २०२०

अमळनेर तालुक्यातील मुंगरे येथील कोरोनागस्त महिलेच्या संपर्कातील मुंगसे येथील ११ तर चोपडा येथील ८ जणंना केले क्वारंटाईन जळगाव येथील राजर्षी शाहू महाराज रुग्णालयात करण्यात आले दाखल



अमळनेर प्रतिनिधी आमदारांच्या चारही गावांना भेटी पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा घेतला आढावा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेली जंतूनाशक फवारणीच ठरू शकते घातक !
डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशनने केले एका दिवसाचे अन्नदान
अमळनेर शहरातही तीन दिवस संचारबंदी लागू केल्याने दिवसभर होता शुकशुकाट
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याती मुंगसे येथील वृद्ध महिलेला कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंगसेसह सावखेडा, रुंधाटी, दारोपी ही चार गावे सील करण्यात आली असून अमळनेर शहरातही अलर्ट करीत तीन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने शहरात दिवसभर शुकशुकाट होता. तसेच मुंगसे येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या ११ जणांसह चोपडा येथील ८ जणांचे जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्वांना जळगाव शहरातील नगरपालिकेच्या राजर्षी शाहू महाराज रुग्णलयाता क्वारंटाईन म्हणून दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ८ अधिकारी आणि १५० कर्मचारी तसचे १५ होमगार्ड शनिवारी रात्रीच तैनात करण्यात आले असून घरातून नागरिक बाहेर पडणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे. तर मुंगसेह चारही गावे सील करण्यात आले आहेत. चारही गावांना हायपोक्लोराईड सोल्युशनने सकाळ आणि संध्याकाळ गावात फवारणी करण्यात येत आहेत. हे तीनही गावे ३ दिवस सील करण्यात आले असून कोणीही आत येणार नाही कोणीही बाहेर जाणार नाही. याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.

चारही गावात सर्दी ताप खोकला संशयित रुग्णांचे सर्व्हेक्षण सुरू
मुंगसेसह चारही गावात सर्दी ताप खोकला संशयित रुग्णांचा ४ पथकांद्वारे सर्व्हे सुरू करण्यात आला असून त्यात संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर यांचा समावेश आहे. या वृद्ध महिलेच्या संपर्क अजून कुठे कुठे झाला आहे याबाबत खात्री केली जात असून या महिलेच्या पतीची देखील स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
गटविकास अधिकारी संदीप वायाळ हे देखील या गावांमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घेत आहेत.

साळीवाडा परिसरातील एक कोरोना संशयित महिलेचे जळगाव येथे मृत्यू
अमळनेर शहरातील साळीवाडा परिसरात एक संशयित महिलेचे जळगाव येथे उपचार घेत असताना मृ्त्यू झाला असून या महिलेचे अहवाल येणे बाकी असून दक्षता म्हणून एक किमीची झोनची फवारणी करण्यात आली आहे. या महिलेला त्रास होऊ लागल्याने येथील २ खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. मात्र त्या डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावून त्या महिलेला जळगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते. दरम्यान, शनिवारी रात्री श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रात्री अडीच वाजेच्या सुमारास त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांची शव रविवारी पहाटे दाखल झाले होते. 7 ते 8 लोकांनी त्यांची अंत्ययात्रा पूर्ण केली. तर सतत या भागात फवारणी करण्यात येणार आहे.

भाजी बाजार, किराणा दुकाने, मेडिकलसह सर्व व्यवहार बंद
अमळनेर तालुक्यातील महिला कोरोनाचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येताच शहर तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात रविवारी सकाळपासूनच भाजी बाजार, किराणा दुकाने, मेडिकलसह सर्व व्यवहार बंद असल्याने शहरात दिवसभर शुकशुकाट होता. प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ आणि पोलिस निरीक्षक अंबादास मोरे हे या सर्व गोष्टींवर आणि शहरावर लक्ष ठेऊन आहेत.

नगरपालिकेचे कर्मचारी आणि निवृत्त सैनिकही उतरले रस्त्यावर
कोरोना पॉझिटिव रुग्ण आढलून आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. त्यामुळे शहरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात पालिकेचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त सैनिकांचीही मदत घेण्यात आली आहे. ते सर्व रविवारी रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरले होते. त्यामुळे शहरात कुणीही फरकताना दिसून आले नाहीत. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नगरपालिकेच्या घंटागाड्या मुख्य रस्त्यावर आडव्या लावून वाहतूक बंद केली होती. तसेच कामाव्यतिरिक्त रस्त्यावर फिरणाऱ्यांना उठाबशा घालायला लाऊन त्यांना शिक्षा केली. त्यामुळे रस्त्यावर बाहेर पडणे बंद झाले. सकाळपासून घंटागाड्या तीन दिवस तालुका बंद असल्याचे जाहीर करत फिरत होत्या. त्यामुळे नागरिक सतर्क झाले. संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत असल्याने नागरिकांनही घरातून बाहेर पडणे टाळले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध