Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

विवरे बु॥ ग्रामपंचायत कडून कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप



रावेर प्रतिनिधी तालुक्यातील विवरे बु॥ ग्रामपंचायत तर्फे ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, कर्मचारी,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक , आरोग्य सेविका यांना कोरोनाच्या संसर्गा पासुन संरक्षणा साठी सर्वांना मास्क, डेटॉल, साबण, हॅण्ड ग्लज, सॅनिटायझर चे मोफत वाटप करण्यात आले. 

यावेळी सरपंच सुनिता सपकाळे , मा.सरपंच वासुदेव नरवाडे , उपसरपंच रविंद्र वासनकर , ग्रामविकास आधिकारी अरविंद कोलते, सद्स्य भागवत महाजन, बिसन सपकाळे, आरोग्य सेविका सौ भोळे,आशा वर्कर सौ भारती जिरी, आशा तडवी, मोहिनी राणे, अंगणवाडी सेविका सुनंदा दहिभाते, प्रतिभा बेंडाळे , सिंधू बोरोले , आशालता राणे , उषा पारसकर, क्लार्क सुरज नरवाडे, प्रल्हाद पुनतकर, प्रभाकर गाढे, राहूल पाटिल , सुनिल हंसकर, मुकेश हंसकर, किशोर कंडारे यासह कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध