Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

लॉकडाउन काळात रावेर मधील वक्रांगी केंद्र ठरतंय वरदान



प्रतिनिधी रावेर कोरोनाशी दोन दोन हात करण्यासाठी सर्व देश एकवटला असतानाच जळगाव जिल्ह्यातील रावेर मध्ये बँकिंग सेवाही एक पाउल पुढे आहे. आत्तापर्यंत ब-याच ग्राहाकांना रावेर शहरातील वक्रांगी केंद्रातून सुरक्षित सेवा देण्यात आली आहे. 

व या पुढेही दिली जाणार आहे. केंद्रावर ग्राहाकांना हात धुण्यासाठी साबण, संनिटायझार आदी सुविधा उपलब्ध आहे. यातून कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होत आहे.

कोरोना संसर्ग वाढू लागताच देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउन मुळे बरेच व्यवहार बंद असून यामुळे काही ठिकाणी अडचणी येउ लागल्या आहेत. दरम्यान जीवनावश्यक व अत्यंत गरजेच्या सेवा सुरु आहेत. या सेवा देतांना काटेकोरपणे नियम पाळण्याचे निर्देश आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील वक्रांगी केंद्राद्वारे बँकिग सुविधा दिली जात आहे. रावेर शहराशी मोठा ग्रामीण भाग जुळलेला असल्याने या बँकिंग सेवेचा सगळ्यात मोठा फायदा दिसून येत आहे. 

नुकतेच आंध्रा बँक व कॉर्पोरेशन बँकेचे विलीनीकरण युनियन बँकेत झाल्याने त्याचा फायदा रावेर परिसरातील ग्राहकांना होणार आहे. येथील केंद्र हे युनियन बँकेचे अधिकृत ग्राहक सेवा केंद्र सुद्धा असल्याने आता आंध्रा बँक व कॉर्पोरेशन बँकेचे व्यवहार या केंद्रातून करणे सोयीचे होत आहे. बँका ठराविक वेळेतच तसेच कामकाजाच्या दिवशीच सुरु राहत असल्याने सध्या लॉकडाउनच्या काळात या केंद्राचे महत्व अधोरेखित झाले आहे. 

या केंद्राच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात हजारो ग्राहकांना सेवा देण्यात आलेली आहे.

या केंद्रातून सर्व बँकांचे पैसे काढणे, पैसे पाठविणे यासह मोबाईल डिश रिचार्ज, अत्यावश्यक औषधे, जीवनावश्यक वस्तू तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वक्रांगी केंद्राच्या माध्यमातून शरीराची तब्बल ८२ प्रकारच्या रक्ततपासणी देखील केली जाते. विभागीय व्यवस्थापक निखील शहा व जिल्हा व्यवस्थापक निलेश पारगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रचालक विजय पाटील या केंद्रात सुविधा देता आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध