Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ एप्रिल, २०२०
रावेर येथील युवकांचे सुरत मध्ये ( गुजरात ) येथे गोरगरीबांना अन्नदानाचे वाटप
रावेर दि २७ (प्रतिनिधी) येथील युवकांनी सुरत ( गुजरात ) येथे सलग २५ दिवसांपासून गरीब व गरजू लोकांना मदत म्हणुन अन्नदान करीत आहे.
हे युवक रावेर येथील सिध्दार्थ नगर येथील रहिवासी असुन काही युवक सुरत येथे खाजगी कंपनीत कामाला आहे. तर, काही युवक वेगवेगळया प्रकारचे व्यवसाय करीत आहे. सध्या भारत देशात कोरोना व्हायरस या विषाणू च्या प्रादुभार्वाने थैमान घातले असुन त्याचा देशात लॉकडाऊन ही जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट भरणारे गोर गरीबांना उपासमारीची वेळ आली आहे. रावेर येथील सिध्दार्थ नगर ह.मु. सोम चिंतामणी गाव ता. सुरत (गुजरात ) येथील श्रमिकांना मदतीचा हात दिला आहे. घरापासून लांब राहत असुन स्वतःची काळजी सोबतच हे युवक इतर गोर गरीबांची काळजी घेत आहे.
त्यामुळे रावेर सह परिसरात त्यांचा कार्याचे कौतुक होत आहे. या सेवेमध्ये रावेर येथील योगेश समाधान मेढे, रोहीत समाधान मेढे, ( रा. रावेर ) बाळु नायके, प्रविण गणेश ( मध्य प्रदेश ) , धनेंद्र ससाणे, कैलास तायडे ( मध्य प्रदेश ) यांचा समावेश आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा