Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० एप्रिल, २०२०

नवनियुक्त अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी




उस्मानाबाद प्रतिनिधी कोरोनाव्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे,महाराष्ट्र राज्याची परिस्थिती तर अत्यंत बिकट आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे तीन पेशंट पॉझिटिव्ह आढळले होते.14दिवसा नंतर त्यांचे देखील रिपोर्ट निगेटिव्ह आले व संपूर्ण जिल्हा कोरोना मुक्त झाला, तरी देखील आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
        
परंडा तालुका महिला व बालविकास अधिकारी पद बऱ्याच दिवस रिक्त होते,या पदावर अलीकडेच नवनियुक्त झालेले श्री.नारायण गायके यांनी पदभार स्वीकारताच,अनेक कामाला वेग आला. अंगणवाड्यांमध्ये दिले जाणारे शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहार व्यवस्था प्रथम सुरळीत केली.परंतू काही दिवसातच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढला व संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. याचा फटका अंगणवाडीला देखील बसला,अंगणवाड्या बंद झाल्या  मात्र,असे असले तरी बालकांच्या आहारात खंड पडू नये म्हणून,गरम ताज्या आहाराऐवजी शिधा घरपोच देण्यात येत आहे.सामाजिक अंतराचे काटेकोर पालन केले जात असून,मास्क व हँडग्लोव्हजचा वापर केला जात आहे. अंगणवाडी सेविका लाभार्थी बालकाच्या पालकांना अंगणवाडीत बोलावून पॅकिंग स्वरूपातील व कोरड्या स्वरूपातील शिधा देत आहेत. यावरूनच नारायण गायके यांची दूरदृष्टी लक्षात येते. 
    
आज यशोमती ठाकूर यांनी निर्णय घेऊन 15मे पर्यंत कोरडा शिधा देण्यात येणार आहे. आवश्यक तो पुरवठा राज्यात झालेला आहे व राहिलेला लवकरच होईल असे सांगितले.
           
तालुक्यातील अंगणवाडी सेविका देखील ग्रामसेवक,तलाठी यांच्या सोबत मदत करत आहेत. गावात आलेल्या नवीन लोकांची माहिती घेऊन संबंधितांना माहिती पुरवठा करत आहेत.तसेच आवश्यकती योग्य माहिती संकलित करत आहेत. 

स्तनदामाताची व बालकांची काळजी घेत आहेत.स्वतः फिल्डवर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या कामाची पाहणी करून, प्रोत्साहन देत आहेत. 

परंडा तालुका महिला व बाल विकास अधिकारी, गायके  यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून आढावा घेतला असता सदर माहिती प्राप्त झाली.
  
खरोखरच तालुक्याला एक जबाबदार व कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाला. नागरिक त्यांच्या कार्यावर  समाधानी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध