Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
हे’ तीन पत्रकार आहेत मागील दोन महिन्यांपासून गायब
जळगाव प्रतिनिधी :चीनच्या वुहान शहरातून होणारा कोरोनाचा वाढता फैलाव उघड करणारे तीन पत्रकार मागील दोन महिन्यांपासून गायब आहेत.
चेन क्यूशी, फेंग बिंग आणि ली जहुआ अशी या तिन्ही पत्रकारांची नावे आहेत.
चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा फैलाव जगभरात होत असल्याची माहिती या पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड केली होती. तिघांनीही यूट्युब आणि ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करून याबाबतची माहिती समोर आणली होती. त्यानंतरच हे तिन्ही पत्रकार रहस्यमयरित्या गायब झाले आहेत.
चेन क्यूशी हे 34 वर्षीय पत्रकार 6 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजल्यापासून गायब आहेत. फेंग बिंग हे 9 फेब्रुवारीला सोशल मीडियावर काही व्हिडीओ टाकल्यापासून गायब आहेत. तर ली जहुआ हे 25 वर्षीय पत्रकार 26 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. ते एका वृत्तवाहिनीसाठी काम करत होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा