Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
महापौरांच्या सुचनेनंतर पावसाळापूर्वी उपाययोजनांना सुरुवात ; जळगाव शहरात तीन ठिकाणी नालेसफाई सुरू ; महापौरांनी केली पाहणी
महापौरांच्या सुचनेनंतर पावसाळापूर्वी उपाययोजनांना सुरुवात ; जळगाव शहरात तीन ठिकाणी नालेसफाई सुरू ; महापौरांनी केली पाहणी
जळगाव प्रतिनिधी:जळगाव शहरातील गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता पावसाळ्याच्या अगोदर उपाययोजना राबविण्यात याव्या अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी मनपा प्रशासनाला केल्या होत्या. महापौरांच्या सुचनेच्या अनुषंगाने मंगळवारपासून शहरातील उपनाल्यांच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली.
शहरात पावसाळ्यात जळगावकरांना येत असलेला कटू अनुभव टाळण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाला पत्र देत पावसाळ्यापूर्वी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. जळगावात साथरोग नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याची बाब महापौरांनी निदर्शनास आणून दिली होती. महापौरांच्या पत्रानंतर मनपा प्रशासन कामाला लागले असून मंगळवारपासून शहरातील उपनाले सफाईला सुरुवात करण्यात आली.
मंगळवारपासून शहरात लक्ष्मीनगर, पिंप्राळा धनगर वाडा परिसर, कानळदा रोड या तीन ठिकाणी नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तिन्ही ठिकाणी महापौर भारती सोनवणे यांनी सकाळी पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, कुंदन काळे, प्रकाश बालाणी, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, नगरसेवक अमर जैन, मयूर कापसे, सरिता नेरकर, ऍड.दिलीप पोकळे यांच्यासह प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा