Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

खिर्डी येथे शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ,कडधान्याचे वाटप.



खिर्डी:प्रतिनिधी:येथील जि प उर्दू शाळेत नुकताच शाळेतील विद्यार्थ्यांना तांदूळ व विविध प्रकारच्या दाळी वाटप करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे़ यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. 

या पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार योजना सुरू असलेल्या विविध शाळांमध्ये पडून असलेला दाळ- तांदूळाचा साठा शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते.

देशात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत १५ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन आहे़ दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुमोटो रिट याचिकेद्वारे विविध शाळांमध्ये पडून असलेले धान्य आणि इतर साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे़ यानुसार शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे तांदूळ व डाळी हे साहित्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

तसेच येथील शाळेत ग्रामस्थांना रांगेत उभे करून त्यांच्यामध्ये एक मीटर अंतर ठेऊन त्यांना तांदूळ व दाळी वाटप करण्यात आले.या वेळी खिर्दू बुद्रुक  सरपंच किरण कोळी,माजी पोलिस पाटील अरुण पाटील ,जयंत पाटील,प्राथमिक विद्यामंदिर खिर्डी चे मुख्याध्यापिका  स्वाती झोपे,सुषमा सूरदास,कुंदा पाटील ,अविनाश फासे ,रुपाली चौधरी, युवराज सपकाळे 
गौरव पाटील उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आसिफ बेग,शेख अस्लम, किरण नेमाडे,गंभीर पाटील,नईम बेग,शेख काय्युम,शेख इम्रान,फिरोज खान,शेख इरफान,तसेच उर्दू शाळेतील मुख्याध्यापक आदिल खान,अनिस खान,जावेद खान,माजिद खान,एजाज अहेमद,शेख इद्रीस,आदि सह शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध