Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
शिदोरी वाटपातुन समाजसेवेचे कार्य पुर्ण करत आहोत... श्री दादा मल्लाव, पुणे
पुणे:प्रतिनिधी समस्त मल्लावभोई समाज (महाराष्ट्र ) तर्फे शिदोरीच्या स्वरुपात अन्न धान्य वाटप करण्यात येत आहे आणि हे कार्य समाज बांधवांच्या मदतीने चालु राहील असे नमुद करतो.
पुणे विभागात समस्त मल्लाव भोई समाज पुण्याचा विद्यमान अध्यक्ष म्हणून मी श्री दादासाहेब किसनराव मल्लाव व आपल्या सहकारी बांधव यांच्या संकल्पनेतून समाजातील काही दानशूर बांधवांनी अन्न धान्य शिदोरी म्हणून मदत करून ती एकत्रित जमा केली आणि ज्या विभागात मल्लाव भोई समाज बांधवांचे हातावर पोट आहे तसेच ज्या सबला विधवा माता - भगिनी या लॉकडाऊन काळात अडचणीत आहेत त्यांना या शिदोरीचे वाटप करण्यात आले.
त्यात पुणेशहर, पिंपरीचिंचवड शहर, शिरुर, हवेली, खेड, पारनेर, दौंड तालुक्यातील काही गावातील 165 गरजू समाजकुटुंबाना वाटप करण्यात आली. यावेळी समाजघटकाचे मदतीचे मोठे सहकार्य यावेळी लाभले आणि आम्ही समस्त समाजबांधव यांचे ऋणातही आहोत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा