Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
भिलाली येथे रेशन दुकानावर गर्दी करण्याच्या कारणावरून कोतवाल यांनी केला गुन्हा दाखल :
भिलाली येथे रेशन दुकानावर गर्दी करण्याच्या कारणावरून कोतवाल यांनी केला गुन्हा दाखल :
अमळनेर i
प्रतिनिधी – (शिवाजी
पारधी ) कोरोनो व्हायरसच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे.
त्यासाठी शासन स्तरावर प्रत्येक अधिकारी ,कर्मचारी यांना योग्य ते तोंडी व लेखी
आदेश देण्यात आले आहेत .
देशाच्या शेवटचा पातळीवर
कार्यरत असलेला ग्रामीण भागातील कर्मचारी यांनी देखील त्यांच्या हाताखाली काम करत
असणाऱ्या कर्मचारी यांना जबाबदारी दिली आहे व त्या जबाबदारीचे पालन करणे हे त्या तळागाळातील कर्मचाऱ्याचे कर्तव्यच आहे. या
महामारीच्या संकट समयी मात्र काही गावांतील नागरिक हेतू पुरस्कर पालन करत नसल्याचे
दिसून येत आहे. अशीच एक घटना भिलाली येथे घडली असून त्या अनुषंगाने तेथील कोतवाल सागर
पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत चार जणावर गुन्हा दाखल केला
भिलाली येथील तलाठी
यांच्या तोंडी आदेशानुसार कोतवाल हे रेशन
दुकानावर गर्दी होवू नये म्हणून थांबले होते .त्याठिकाणी लोकांनी तोंडाला मास्क
,रुमाल बांधावा व सुरुक्षित अंतर ठेवावे अश्या सुचना कोतवाल संभाजी पाटील करत होते
. अश्यातच रेशन दुकानावर समाधान गिरासे यांनी विना मास्क बांधता गर्दी करून नियम
मोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याला समजवले व तो मागे गेला व परत पुढे आला व कोतवाल सागर पाटील यांनी
त्याला पुन्हा समज दिली व तो घरी निघून गेला.
रेशन वाटप झाल्यावर संभाजी पाटील घरी आराम करत असतांना समाधान गिरासे यांचे मावसे
हरसिंग,अजय,अमर व लालसिंग गिरासे हे
कोतवाल यांना घरी जावून शिवीगाळ करत
हाता बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा