Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

त्या दोघांनी एकाला लुटले मात्र चोरीच्या मोबाईलमुळे शिताफीने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.



शिरपूर:प्रतिनिधी: शिरपूर येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने खापर ता.अक्कलकुवा येथील २८ वर्षीय युवकाला लुटल्याची घटना दि २३ रोजी शहरातील मांडळ शिवारात घडली होती.याबाबत शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खापर ता.अक्कलकुवा येथील जितेंद्र गौतमचंद जैन वय २८ हा करवंद नाका येथे मोटरसायकलीला लिफ्ट मागीतली त्याला दोन युवकांनी मोटरसायकलीवर बसवुन निर्जनस्थळी नेत तेथे जितेंद्र जैन यांच्या ताब्यातील मोबाईल व रोकड असा २४ हजाराचा मुद्देमाल लुटल्याची घटना दि २३ रोजी घडली होती.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर पोलीसांनी या गुन्ह्याचा शिताफीने तपास सुरु केला होता.अखेर शोध लावत असतांना चोरीस गेलेल्या मोबाईलमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.व शिरपूर शहर पोलीसांनी संशयित अशोक राजेंद्र चौधरी वय २२ व राहुल मारूती बेलदार वय २७ दोघेही रा.किस्मतनगर,शिरपूर यांना काल दि ४ रोजी ताब्यात घेतले.दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण बाऱ्हे,ललित पाटील,संदीप रोकडे,योगेश कोळी,मुजाहिद शेख यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध