Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ एप्रिल, २०२०
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी येथे गरजूंना धान्यवाटप
जळगाव प्रतिनिधी:लॉकडाउन’मुळे कष्टकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप माळी यांनी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन पाळधी परिसरात घरोघरी सुमारे 11 क्विंटल धान्याचे वाटप केले.
यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील, सरपंच चंदु माळी, सामाजिक कार्यकर्ते आबा माळी, यासह उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप माळी म्हणाले, ‘करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे कष्टकरी लोकांचा रोजगार पूर्णत: थांबला आहे. त्यामुळे त्यांना दैनंदिन अन्नधान्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
पाळधी परिसरातील हातावर पोट असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पाळधी परिसर माझ्या कुटुंबासारखेच आहे व त्यामुळे अन्नधान्याचे वाटप केले.’
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा