Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ एप्रिल, २०२०
गरिबांच्या मदतीसाठी सरपंच आले पुढे
खामगाव प्रतिनिधी मोताळा : कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखन्यासाठी देशभरात लॉकडाऊन झालेले आहे. त्यामुळे रोजगार बंद झाला आहे व गरीब, निराधार यांना उपासमारी ची वेळ आलेली दिसून येत आहे. या संकटात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी काही ठिकाणी लोक पुढे येताना दिसत आहेत. मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.
मोताळा तालुक्यातील सिंदखेडा गावात लॉकडाऊन चे परिणाम दिसून येत आहे. रोजगार बंद झाला आहे, त्यामुळे गरीब, निराधार यांना संकटाचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सिंदखेडा सरपंच सौ. विमल अर्जुन कदम यांनी मागासवर्गीय वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला व गावातील भूमिहीन शेतमजूर यांची हातमजुरी कोरोना मुळे बंद पडली त्यासाठी सरपंच यांचे कडून 7 किलो गहू व 1 किलो तेल मदत म्हणून वाटप करण्यात आले. गावातील 120 कुटुंब यांना ही मदत करण्यात आली आहे.
“आपण झिजोनी अंगे स्वत:।
जीवजंतूशी द्यावी प्रसन्नता!!
सुखी करावी गावाची जनता ।
हीच सेवा पुण्यकर !!
या उंक्ती प्रमाणे समाजासाठी काही तरी देणे लागते, या भावनेतून मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न केला असून, यातून आत्मिक समाधान मिळालं याचा आनंद आहे असे सरपंच पुत्र आप्पा कदम यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना सांगितले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा