Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

पोलीस, आरोग्य व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना... आ.डॉ.संजय कुटे कडून पीपीईच्या ५०० किट



शेगावात विभाग प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १०० बेडची व्यवस्था
समोसा रुग्णालयाची एक इमारत राखीव
डीवायएसपी, एसडीओ शेगावात तळ ठोकून

शेगाव प्रतिनिधी:कोरोना व्हायरसने केलेल्या धुमकुळावर प्रतिबंध लावण्यासाठी काम करीत असलेल्या यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी वर्ग सुरक्षित रहावा याकरिता फिल्डवर काम करणाऱ्याजळगाव जामोद मतदारसंघातील पोलीस, आरोग्य व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांच्याकडून तबबल ५०० पीपीई ( personal protective equipment) किट देण्यात येत आहेत.
      
शेगाव शहरात कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्या नंतर प्रशासनाची महत्वपूर्ण बैठक शहर पोलीस ठाण्यात आ.डॉ.संजय कुटे यांनी घेतली असून यामध्ये आरोग्य विभागाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्यानंतर जनजागृती व उपाययोजना यावर चर्चा केली मतदारसंघातील पोलीस, महसूल व आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ ५०० पीपीई किटची ऑर्डर दिली असून आजच त्या उपलब्ध होणार आहेत. शेगावात कोरोना बाधित आढळल्याने शहराच्या सीमा सील करण्याबाबत व हायरिस्क एरियात एकही बाहेरचा व्यक्ती जाता कामा नये असा बंदोबस्त लावण्याचे पोलिसांना अवगत केले त्यानंतर समोसा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय सेवेबाबत आढावा घेतला. यामध्ये १०० बेडची व्यवस्था कोविड १९ करिता करण्याचे निर्देश दिले तसेच रुग्णालयातील मागच्या बाजूची इमारत कोविड १९ करीता राखीव ठेवण्याचे सांगितले. तर गरज भासल्यास शासनाच्या अखत्यारीत असलेल्या नवोदय विद्यालय, मुला-मुलींचे वसतिगृह देखील कोविडच्या उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार असल्याचे आ.डॉ.कुटे यांनी सांगितले. यावेळी डीवायएसपी हेमसिंग राजपूत, एसडीओ मुकेश चव्हाण, तहसीलदार श्रीमती शिल्पाताई बोबडे, ठाणेदार संतोष ताले, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण घोंगटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रीती जाधव, भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल, पांडुरंग बूच, राजू अग्रवाल उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध