Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
जळगाव महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद ; प्रशासनाकडून निर्जंतुकीकरणासाठी साबणांचा साठा सुपूर्द !
जळगाव महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद ; प्रशासनाकडून निर्जंतुकीकरणासाठी साबणांचा साठा सुपूर्द !
जळगाव प्रतिनिधी:जळगाव शहर मनपाच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागातील अधिकारी, मुकादम, कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले होते. महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने निर्जंतुकीकरणासाठी साबणांचा साठा मनपाकडे सुपूर्द केला.
कोरोनाविरुद्ध लढा देताना डॉक्टरांसह जीव धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवणाऱ्या मनपाच्या आरोग्य व साफसफाई विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक धोका असतो. मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले होते.
महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केमिस्ट असोसिएशन, संपर्क फाऊंडेशन, भारत विकास परिषद, रेडक्रॉस यासारख्या अनेक संस्था पुढे येत आहे. शनिवारी देखील जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली साबणांचा साठा महापौरांकडे सुपूर्द केला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, डॉ.प्रसन्नसुमार रेदासनी, सुभाष साखला, उज्ज्वला वर्मा, जळगाव शहर मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे आदी उपस्थित होते.
साबणांचे असे होणार वितरण
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या साबणांच्या साठ्याचे वितरण केले जाणार आहे. त्यात कायम कामगार ४३२, मक्तेदाराचे कामगार ४००, वाहनचालक, हेल्पर २५०, कायम वाहनचालक ६३, व्हक्युम गार्ड ३३, आरोग्य निरीक्षक १९, मुकादम ४० अशा १२२७ कर्मचाऱ्यांना वितरित केले जाणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा