Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ एप्रिल, २०२०
दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय
जळगाव प्रतिनिधी: महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन येत्या 30 एप्रिल पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला आहे.
त्यामुळे विविध कार्यक्रम, शाळा, महाविद्यालयांच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर दहावीचा शेवटचा म्हणजेच भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापन करुन गुण देण्यात येणार आहेत. तर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती.
दहावी बोर्डाचा भूगोलाचा पेपर 21 मार्चला होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तो स्थगित करण्यात आला होता. तर वर्षा गायकवाड यांनी 14 एप्रिल नंतरची राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून भूगोलाचा पेपर ठेवण्यात येईल असे म्हटले होते. मात्र आता राज्यात वेगाने कोरोनाचा फैलाव होत असल्याने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता एससी बोर्डाचा भूगोलाचा पेपर रद्द केला आहे.
त्याचसोबत नववी आणि अकरावीची परिक्षा होणार नसल्याचा सुद्धा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परिक्षा झाली होती. पण आता दुसऱ्या सत्राची परिक्षा होणार नाही आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा