Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ एप्रिल, २०२०
लॉकडाऊन मधे घराघरात रामयणाचा गजर
बुलडाणा:प्रतिनिधी कोरोना व्हायरसनं आता भारताला विळखा घालायला सुरुवात केली आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं.
त्यामुळे आता घरी राहून नेमकं काय कराव असा प्रश्न सर्व लोकांच्या मनात आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीलाही या Covid – 19 व्हायरसचा फटका बसताना दिसत आहे. सिनेमांचे शूटिंग थांबवण्यात आले आहेत. नवे सिनेमा प्रदर्शित होत नाही आणि डेलिसोपचे शूटिंग सुद्धा बंद पडल्यानं टीव्हीवर काय कार्यक्रम पाहावे हा प्रश्न सध्या निर्माण होताना दिसत असल्याने आता केंद्र सरकारनं एकेकाळचा सर्वात लोकप्रिय टीव्ही शो रामायण शनिवार पासून पुन्हा प्रसारित करने सुरु केले आहे.
दूरदर्शनच्या डीडी नॅशनल वाहिनीवर सकाळी नऊ ते दहा आणि रात्री नऊ ते दहा या वेळेत रोज दोन भाग प्रसारित करण्यात येत आहे. ८० च्या दशकामध्ये आतासारखे केबल, डिश टीव्ही आणि केबलचे हे प्रकार नव्हते. त्याकाळी केवळ दूरदर्शन आणि डीडी मेट्रो या दोनच वाहिन्या होत्या.
त्यामुळे त्याकाळी प्रेक्षकांचं मनोरंजनाचं साधन म्हणजे या दोन वाहिन्याच. या वाहिन्यांनी त्यावेळी ‘महाभारत’ आणि ‘रामायण’ सारख्या पौराणिक कथा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. या मालिकांपैकी रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका बरीच गाजली होती.
सध्या देशात कोरोनाच्या जागतिक साथीच्या मुकाबल्यासाठी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउन मुळे घराघरांमध्ये सक्तीने बंद होऊन राहावे लागणाऱ्या नागरिकांसाठी दूरदर्शनने शनिवार पासून रामायण या गाजलेल्या मालिकेचे पुनःप्रसारण सुरु केले.
यामुळे आता बच्चे कंपनी पासून पासून घरातील प्रत्येक सदस्य मालिकेच्या वेळेवर घरात एका जागी जमत आहेत व घराघरात रामयणाचा गजर होतांना दिसून येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा