Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ एप्रिल, २०२०
... म्हणून मुख्यमंत्र्यांकडून गडकरींचे कौतुक, नितीनजी आपले लाख लाख धन्यवाद
देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे,
मुंबई प्रतिनिधी राज्यातील विशेषत: मुंबई पुण्यातला कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरित्या वाढवणे याला प्राधान्य असून यादृष्टीने केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले. त्यानंतर आज रविवारी दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी, सर्वप्रथम अक्षय तृतीया, रमजान आणि महात्म बसवेश्वर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्वांनी आपले सण-उत्सव घरात साजरे करुन मानवतेचा धर्म जपला, याबद्दल उद्धव ठाकरेंनी सर्वधर्मीय नागरिकांचे आभार मानले.
देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, तो देव यांच्या माध्यमातून आपलं काम करत आहेत. माणसांत देव आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. त्यानंतर, राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. मी राजकारण बाजूला ठेऊन या लढाईत लढतो आहे. मात्र, काही जणांकडून राजकारण केलं जात आहे. मी या फंद्यात पडत नाही, सध्या कोरोनाच्या लढाईत लढायचं हे माझं प्राधान्यानं काम आहे. पण, मला अनेकांकडून तसं सांगण्यात येतंय. जर, तसं घडत असेल तर मला आवर्जून केंद्रीयमंत्र नितीन गडकरी यांचं आभार मानायचं आहे. नितीनजी आपले लाख लाख धन्यवाद... असे म्हणत मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी नितीन गडकरींना धन्यवाद दिले.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राजकारण करणाऱ्या काहींना नितीन गडकरी यांनी चांगला सल्ला दिलाय. ही वेळ राजकारण करायची नाही, हे नितीनजींनी सांगितलंय. त्यामुळे मला त्यांचे आभार मानावे वाटतात, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांना सल्ला दिला होता. कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये, असे गडकरी यांनी म्हटले होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🛑 _अमळनेर : झोपडीला अचानक आग लागल्याने बोदर्डे येथील काशिनाथ दिलभर भिल या वृद्धाचे कुटुंब उघड्यावर आले असून संसार उध्वस्त झाल्याची घटना २...
-
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधु...
-
अमळनेर : चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ व आरोपीची सखोल चौकशी करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्...
-
शिरपूर प्रतिनिधी - पळासनेर शिवारातील मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूरच्या दारूबंदी विभागाने सापळा लावत पर राज्यातील 27 बिअरचे बॉक्स जप्त करत द...
-
पालकमंत्री गुलाबराव पाटील व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण अमळनेर : तालुक्यातील क्रीडा संकुलातील जुन्या व न...
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
साक्री तालुक्यातील बल्हाणे गावाचे भूमी पुत्र व सद्या पिंपळनेर येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...
-
साक्री (प्रतिनिधी) – खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
नंदुरबार प्रतिनिधी : आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा व शिंदे शिवसेनेत जुंपल्याचे चित्र आहे. 'लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा