Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई



मनारडी येथील प्रकार : ग्राहकांना कमी धान्य देणे भोवले!

संग्रामपूरः काही दिवसांपूर्वी . मनार्डी येथील एका नागरिकाने स्वस्त - धान्य दुकानदार कमी धान्य वाटप करित असल्याची पोस्ट व्हायरल केली होती . त्या पोस्टची दखल अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे यांनी घेत तहसीलदाराने स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले.


सध्या सर्वच स्वस्त धान्य दुकानदारामार्फत धान्याचे वितरण केले जात आहे . मनारडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून ग्राहकांना कमी जास्त धान्य वाटप केले जात असल्याचे काही व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट फिरत होती . संग्रामपूर पुरवठा निरीक्षक एच . डब्ल्य , सोले यांनी बुधवारी प्राथमिक चौकशी केली असता संबंधित दुकानदार दोषी आदळला . स्वस्त धान्य दुकानदार मनार्डी येथील नागरिकांना नियमाप्रमाणे धान्य वाटप न करता मनमानी पद्धतीने वाटप करीत - असल्याचे आढळून आले . याचा " पंचनामा करीन १५ जणांचे बयान नोंदविण्यात आले . पुरवठा निरीक्षक यांनी प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दुकानदावर कार्यवाही करीत हे स्वस्त धान्य दुकान उकळगाव येथील गजानन महाराज स्वयंसहाय्यता बचत गटाला जोडण्यात आले आहे .


१) जिल्हाधिकारी कडून स्वस्त धान्य दुकानावर चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात निर्देश प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने चौकशी केली असता स्वस्त धान्य दुकानावर दोषी आढळून आला आहे .

 -एच.डब्ल्यू .सोले 
पुरवठा निरीक्षक अधिकारी
 संग्रामपूर,जळगांव जा.

२) सोशल मीडियाच्या पोस्ट वरून संबंधित स्वस्त धान्य दुकानावर कार्यवाही करण्याचे निद्रेश संग्रामपूर तहसीलदार यांना देण्यात आले.पुढील कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात येईल.

-प्रमोदसिह दुबे
अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध