Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
लॉक डाऊन सुरू असताना ही आप्त परिवारासमोर केले ' त्या ' दोघांनी लग्न....
शेगांव:प्रतिनिधी सध्या भारतात लॉक डाऊन सुरू असल्याने सर्वच कार्य स्थगित आहेत. अशातच अनेकांची लग्ने सुद्धा लांबणीवर गेली आहेत. लग्नाच्या तारखाही निघून गेल्यात तर काहींच्या तारखा येणार आहेत. पण अशा परिस्थितीत लग्न समारंभ होणे कठीणच आहे.
पण तरीही ना बॅंड ना बाज्या ना बारात ना काही गाजावाजा तश्यात घरामध्ये सन, उत्सव समारंभ साजरे करण्यासाठी किती काळ उलटू द्यावे लागणार याची ठोस शाश्वती नसतांना परिस्थितीवर अवलंबून न राहता शेगाव येथील शहाणे व आंबिलकर परिवाराने एक युक्ती वापरून आपल्या घरातील लग्न लॉक डाऊनच्या काळात अवघ्या ०८ - १० आपल्या परिवारतील सदस्यांसमोर लग्न समारंभ अतिशय साध्या पद्धतीने संपन्न केले. सोबत नवीन म्हणजे ऑनलाईन पद्धतीने नातेवाईकांनी व्हिडिओ कॉल द्वारे अभिनंदन रुपी आशीर्वाद दिले. या इंटनेटच्या काळात अशा पद्धतीने सर्व सोबत असण्याचा अनुभव घेत मोठ्या आनंदात लग्न पार पडले.
हे लग्न आधीच ठरले होते पण लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे लग्न लांबणीवर गेले होते. म्हणून दोघां मुलगा व मुलीच्या मनाचा विचार करत दोन्ही परीवारांनी आज दिनांक १६ एप्रिल सकाळी १२ च्या दरम्यान आपल्या आप्तस्वकीयांना सोबत घेऊन घरच्या घरी दोघांचे लग्न लाऊन दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा