Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेतर्फे गोर गरीब गरजू अश्या ११ हजार लोकांसाठी सुरू असलेला अन्नदान कार्यक्रमासाठी अमळनेरच्या दानशूर,उदार मनाच्या नागरिकांनी मोठया प्रमाणात दान देण्याचे आवाहन गोक्षेत्र प्रतिष्ठाणतर्फे व विविध सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आलेले आहे.
गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेतर्फे गोर गरीब गरजू अश्या ११ हजार लोकांसाठी सुरू असलेला अन्नदान कार्यक्रमासाठी अमळनेरच्या दानशूर,उदार मनाच्या नागरिकांनी मोठया प्रमाणात दान देण्याचे आवाहन गोक्षेत्र प्रतिष्ठाणतर्फे व विविध सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आलेले आहे.
अमळनेर(प्रतिनिधी) येथिल लॉक डाऊन मुळे गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेतर्फे गोर गरीब गरजू अश्या ११ हजार लोकांसाठी सुरू असलेला अन्नदान कार्यक्रमासाठी अमळनेरच्या दानशूर,उदार मनाच्या नागरिकांनी मोठया प्रमाणात दान देण्याचे आवाहन गोक्षेत्र प्रतिष्ठाणतर्फे व विविध सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आलेले आहे.
कोरोना साथीमुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे हातमजुरी करणाऱ्या आणि रोजंदारीने जगणाऱ्या कुटुंबांची उपासमार लक्षात घेऊन गोक्षेत्र प्रतिष्ठान तर्फे सुरवातीस २००० लोकांच्या जेवण्याची सोया करण्यात आली. मात्र गरजू लोकांची संख्या वाढत जाऊन ११००० इतकी झाली शहरात १५ केंद्रांवर दोन वेळचे जेवण पोहचवले जाऊन सोशल डिस्टनसिंग पाळत अन्नदान सुरू होते.
मुंबई येथिल वर्धमान संस्कार धाम च्या मदतीने सुरू असलेले काम आता मदत थांबल्याने स्थानिक दात्यांच्या मदतीवर अवलंबून आहे.यासाठी मा.आ.शिरीष चौधरी,मा.कृषिभूषण साहेबराव पाटील,रामभाऊ संदांनशिव,प्रा गणेश पवार आदींनीही दातृत्व दाखविले.मात्र येणाऱ्या ३० एप्रिलपर्यंत सदर अन्नक्षेत्र सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दातृत्वाची गरज आहे.लोकांनी धान्य अथवा रोख सक्कम स्वरूपात कमीतकमी व जास्तीत जास्त कितीही मदत केल्यास स्वीकारली जाईल. असे श्रीमती भानूबेन शहा गो शाळेतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. दात्यांनी गोक्षेत्र प्रतिष्ठान, अमळनेर च्या I D B I बँक खाते क्रमांक- 0519104000095026 ,
IFSC code: IBKL0000519 या खात्यात थेट आर्थिक रक्कम जमा करावी अथवा व चेतन शाह 9422280850, प्रा अशोक पवार 9422278256,चेतन सोनार 7744022419,महेंद्र पाटील 9011977772 या क्रमांकावर प्रत्यक्ष मदत देण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, गोक्षेत्र प्रतिष्ठाण चे सौ मीना शहा,राजुभाई सेठ,संदिप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, डी ए धनगर, दिलीप डेरे,विक्रम पाटिल,सतिष वाणी आदिंसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा