Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ मे, २०२०
आठवड्यातील तीनच दिवस बाजारपेठ चालू... जिल्हाधिकारी दीपा मुंडे
उस्मानाबाद प्रतिनिधी हा जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरीही सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीनच दिवस जिल्ह्यातील सर्व आस्थापना सकाळी 8:00 ते दुपारी 1:00या वेळेत उघडे राहतील अशी माहिती जिल्हा अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.नागरिकांनी आरोग्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी नाकाला मास्क पुरेसे अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे करावे असे त्या म्हणाल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यातील किराणा भाजीपाला सह मद्य विक्रीचे दुकानेही आठवड्यातील तीन दिवस सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 8:00ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत सुरू राहतील.
फक्त दूध मेडिकल सेवा कृषी अवजारे बी-बियाणे विक्री करणारी दुकाने ही दररोज सुरू राहतील.
जिल्ह्यातील शाळा-कॉलेज,खाजगी शिकवण्या/कोचिंग क्लासेस, मंदिर सिनेमा ग्रह जिम हे बंदच राहतील तर हॉटेलमधील किचन सुरू राहून पार्सल सेवा सकाळी सात ते रात्री सात पर्यंत सुरू असेल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बांधकाम आणि विकासाची कामे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून स्थानिक मजुरांच्या सहाय्याने ही काम सुरू असतील असंही त्या म्हणाल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यातून राजस्थान आणि तेलंगणा राज्यातील 200 मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवले असून आंध्र कर्नाटक केरळ तामिळनाडू चे मजूर यांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं.
जिल्हा कोरोना मुक्त आणि ग्रीन झोन मध्ये आहे. दीड महिन्यानंतर दुकाने उघडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली जिल्हाधिकरी दीपा मुधोळ मुंडे यांनी एक आदेश काढून नियम न पाळल्यास दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत.
सार्वजिनक ठिकाणी थुंकल्यास ( रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय ) - २०० रुपये दंड आणि दंड झाल्यानंतर दुसऱ्यांदा थुंकल्यास फौजदारी कारवाई
सार्वजिनक ठिकाणी मास्क न वापरणे - ५०० रुपये दंड ग्राहकांनी आणि दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास (दोघात किमान ३ फूट अंतर ) ग्राहकास २०० आणि दुकानदारास ५०० रुपये दंड किराणा / जीवनाश्यक वस्तूचे दरपत्रक न लावल्यास - १ हजार दंड
दुचाकीवर चालकाशिवाय दुसरी व्यक्ती बसल्यास - ५०० रुपये दंड
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा