Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ मे, २०२०

अमळनेरचे भुमीपुत्र अप्पर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांच्या कडून आरोग्य कर्मचारी व पोलिसांना मदत


तरुण गर्जना  i उपसंपादक  पंकज पाटील

अमळनेर तालुक्याचे भुमीपुत्र व मारवड विकास मंचाचे मार्गदर्शक अप्पर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व पोलिसांना कोविड-१९ या  संसर्गजन्य महामारी पासून संरक्षण होण्यासाठी मदत करण्यात आली.

आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी ४० संरक्षक सुटस ,शंभर १८० मिली चे  सेनीटायझर ,२०० मास्क,१०० हॅन्ड ग्लोज,पोलिसांसाठी ५० संरक्षक गॉगल्स आणि विना स्पर्श शरीराचे तापमान मोजण्यासाठी १ टेंपरेचर गन व ७० किराणा मालाचे किट्स  देण्यात आले आहेत.
गटविकास अधिकारी श्री संदीप वायाळ व प्रांताधिकारी श्रीमती . सीमा अहिरे यांनी सामान घेऊन जाण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध