Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ मे, २०२०

दहिवद ग्रामपंचायतीत आशा स्वयं सेविका यांचा सरपंच यांच्या हस्ते सत्कार


अमळनेर i प्रतिनिधी  – ( शिवाजी पारधी ,तरुण गर्जना)

दहिवद येथे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतर्फे प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या होत्या .त्यात गावांतील रहिवासी असलेले व कामानिमित्त बाहेर गांवी गेलेल्या तरुणांना गांवी आल्यानंतर त्यांची ग्रामपंचायतीत नोंद करून सर्वे करण्याचे काम आशा स्वयं सेविका यांनी गावातील आरोग्य सेविका आश्विनी पाडळे यांच्या मदतीने केली आहे  .




गावांत बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांचा सर्वे झाल्यावर त्यांच्यात कोविड-१९ चे लक्षण दिसतात का ? यासंबधी विचारपूस करण्यासाठी आशा  स्वयं सेविका घरो-घरी फिरत होत्या. बाहेर गावाहून आलेल्यांना  १४ दिवस घरीच नियंत्रण कशात ठेवण्यात आले होते .

त्यांच्या या दहिवद गावातील कोरोना संदर्भात घरोघरी जावून  लोकांमध्ये जनजागृती  करत आपले कर्तव्य बजावले म्हणून  ग्रामपंचायत प्रथम लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील ,उपसरपंच वैशाली माळी,ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाणे व सदस्यांनी त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देत अभिनंदन पत्र दिले .

त्यात संगिताबाई रमेश महाजन.मनिषाबाई अनंत सोनवणे,रेखाबाई दगडू माळी ,वैशालीबाई गुलाब महाजन,मनिषाबाई अनंत सोनवणे ,शकुंतला सोनवणे  व स्वच्छता दूत भागवत सोनवणे यांना प्रोत्साहन बक्षीस व अभिनदन पत्र सरपंच व सदस्य यांच्या हस्ते देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध