Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ मे, २०२०
सेंट्रल बँक निंभोरा येथील शिपायाची असभ्य वागणूक....
ग्राहकांकडून होतेय बदली ची मागणी....
खिर्डी प्रतिनिधी: रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक नेहमी उशिरा येत होते त्यांची बातमी दैनिकामधून प्रकाशित होताच व्यवस्थापक वेळेवर यायला सुरुवात झाली पण आता याच सेंट्रल बँक मधील शिपाई छगन बुंदले हा बँकेत येणाऱ्या लोकांशी असभ्य वर्तवणूक करीत असताना ची तक्रार पुढे येत आहे,.जीवणाआवश्यक व अत्यंत गरज म्हणून ज्याची म्हणजे पैसे ते काढण्यासंबंधी गोरगरीब व कष्टकरी जनताही बँकेच्या कामकाजा च्या वेळेस ही आपले पैसे मिळवण्यासाठी ताटकळत उभे राहत असताना या मुजोर शिपाईची असभ्य वर्तन लोकांना सहन करावी लागत आहे.सविस्तर वृत्त असे की,खिर्डी येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर महाजन हे कर्जा विषयी विचारण्यासाठी निंभोरा स्टेशन येथील सेंट्रल बँक मध्ये गेले असता गेट वर असलेला छगन बुंदले हा शिपाई ला त्यांनी मॅनेजर साहेब ना भेटायचं आहे अशी विचारणा केली असता त्यांच्याशी असभ्य वर्तवणूक केली, मीच साहेब आहे,साहेब दुपारी 3 नन्तर भेटतील असे उर्मटपणे बोलतो.या शिपाई चे मॅनेजर यांच्या कडे तक्रार केली असता त्यांच्या समोर ही मोठ्या अधिकार्यला लाजवेल अशी वर्तवणूक करत होता ही वर्तवणूक एका दिवसाची नव्हे तर नेहमीचीच झालेली आहे . या शिपाई ची ही मुजोरी बँक मॅनेजर का ऐकून घेतात हा प्रश्न पडतो,बँकेत येणाऱ्या प्रत्येक लोकांची ही तक्रार आहे.
या शिपाईची बदली व्हावी अशी निंभोरा परिसरातील ग्राहकांची मागणी आहे. याकडे लवकरात लवकर सेंट्रल चे वरिष्ठ अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही असे दिसून येते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा