Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ मे, २०२०
डॉ ईशी दाम्पत्याची डॉ कलाम देवदूत पुरस्कारासाठी निवड
शिरपूर(प्रतिनिधी) येथील डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉ सुनिल जगन्नाथ ईशी व डॉ सौ कांचन सुनिल ईशी या दाम्पत्याची कोरोना कालावधीत विशेष सेवा देऊन मोफत औषध देऊन काम केल्याने त्यांची डॉ एपीजे अब्दुल कलाम देवदूत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कुंभारटेक,शिरपूर येथील साईसृष्टी क्लीनिकचे संचालक तथा डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉ सुनिल जगन्नाथ चौधरी(ईशी) आणि डॉ सौ कांचन सुनिल चौधरी(ईशी*) या डॉक्टर दाम्पत्याची डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या मिशन देवदूत अंतर्गत डॉ एपीजे कलाम देवदूत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कोरोना काळात आयुष् मंत्रालयाने सुचवलेल्या रोग प्रतिकार शक्ती (इम्मुनेनो बूस्टर) होमिओपॅथी औषध व ते घेण्याची पद्धत, तयार करून ते कोरोना काळात काम करणाऱ्या सर्व पोलिस कर्मचारी, पत्रकार, तहसील कार्यालय अधिकारी, कर्मचारी,नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार,आंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका व त्यांचे कुटुंब व शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे ,व त्यांचे कुटुंब यांना मोफत औषध वाटप करण्यात आले.डॉक्टर्स क्लबतर्फे शहरात रात्रंदिवस कोरोना मुक्तीसाठी काम करणारे पोलीस, कर्मचारी, यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, सफाई कर्मचारी,पोलीस,यांचेसाठी कोरोना बचावासाठी डॉक्टर्स क्लबतर्फे मार्गदर्शन पर व्हेबिनारचे ही आयोजन केले होते.
डॉ सुनिल जगन्नाथ चौधरी हे डॉक्टर्स क्लब शिरपूर अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यामार्फत विविध आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले आहेत.डॉ सौ कांचन सुनिल चौधरीउपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या देवदूत दाम्पत्य साठी डिजिटल आभार पत्र पाठविण्यात आलेले आहे.
कोरोना संकट मुक्त झाल्यावर नासिक येथे त्यांचा कलाम कुटुंबियांचे उपस्थितीत सन्मानपत्र देऊन सत्कार केला जानार आहे.
त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे माजी मंत्री अमरिषभाई पटेल, आमदार कांशीराम पावरा, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,राजगोपाल भंडारी, तपनभाई पटेल,प्रांताधिकारी विक्रम बांदल,तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधीक्षक डॉ ध्रुवकुमार वाघ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रसन्न कुलकर्णी, न प मुख्याधिकारी अमोल बागुल, माजी उपनागराध्यक्षा सौ छाया शामकांत ईशी, सौ मानिषाताई चौधरी,मनीष चौधरी,डॉक्टर्स क्लबचे सचिव डॉ अनिल पाटील,डॉ आशिष अग्रवाल , डॉ जितेंद्र शाह,डॉ प्रवीण महाजन, डॉ प्रवीण चौधरी,डॉक्टर्स क्लबचे सर्व पदाधिकारी, तेली समाजाचे पदाधिकारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा