Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० जून, २०२०

पुणे विभागातील मल्लाव-भोई समाज प्रवाहातील एकत्र विचाराचा झरा काळाच्या पडद्या आड..! श्री अर्जुनभोई, मुंबई



मुंबई/पुणे प्रतिनिधि:राज्यात भोई आणि त्याच्या विविध तत्सम जमाती ज्या महाराष्ट्र सरकारसमोर  NT-B मध्ये अंकीत आहेत अर्थात कहारभोई, झिंगाभोई, परदेशीभोई, राजभोई, कहारगोडीया, किरात, मछुआ, मांझी, जतिआ, केवट, ढीवर, धीवर, धीमर, पालेवार, मच्छिंद्र, नावाडीभोई, मल्हार, मल्हाव, मल्लाव,बोई, नावाडी, नावाडीतारु, खाडीभोई, गाढवभोई, खारेभोई, ढेवरा, भनारा-भनारी-भनारे, निषाद, मल्ला, मल्हारभोई, नाविकभोई, ओडेवार, ओडेलु, बेस्तार-बेस्ता यातील आमचा मल्लाव-भोई समाज आजही आपल्या समस्यांनी व्यस्त आहे. त्याच्या सामाजिक समस्या दूर करण्यासाठी पुणे विभागात मा दादाजी मल्लाव, मा मनिषजी काचीसाहेब, ताराचंदजी परदेशी-कंचे व त्यांच्या संपुर्ण सामाजिक टीमचे खुप मोठे योगदान आहे असे आम्ही तरी मानतो. आज आमच्यामध्ये मा ताराचंदजी भगवानराव परदेशी-कंचे नाहीत. 

त्यांचा पुणे विभागातुन मल्लावसमाज रजिस्ट्रेशन करण्यात सर्वात पुढे पुढाकार होता आणि समाजाची सोसायटी स्थापन करतांना सुध्दा पुढाकार होता. समाजसेवेचे कार्य त्यांनी त्यांच्या टीम बरोबर केले. सामुहिक विवाह सोहळा,काहींना सामुदायिक आर्थिक मदत जी व्यापार तत्वप्रणालीला उभारणी करण्यासाठी उपयोगी होता यामध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा होता. 

मल्लावसमाज आणि भोईसमाज हा एकच समाज आहे किंबहुना ती एकाच बाबाची लेकरं आहेत आणि त्यांना एकत्र आणण्यास त्यांनी मा दादाजी मल्लाव, मा मनिषजी काची यांच्या बरोबर आणि त्यांच्या संपुर्णटीम बरोबर प्रयत्न केले होते. 

त्यातुनच पुणे विभागात भोईमल्लाव समाज सत्कार समारंभ तसेच सामाजिक एकोपा वाढीस लावणारे इतरही कार्यक्रम ठिकठिकाणी मोठया प्रमाणात साजरे केले आहेत. कै ताराचंदजी भगवानराव परदेशी-कंचे हे खालील ठिकाणी सरचिटणीस म्हणून ही कार्यरत होते त्यात समस्त मल्लावसमाज पुणे, समस्त मल्लावसमाज मंगळवारपेठ क्रेडिट सोसायटी, पुणे तसेच ते भोईसमाज क्रांतीदल महाराष्ट्र प्रदेश या सामाजिकपातळीवर कार्यरत असलेल्या सामाजिक संघटनेचे पुणेशहर प्रसिद्धी प्रमुख ही होते. त्यांचा दशक्रिया विधी हा रविवार ५/०७/२० रोजी संगमघाट, RTOजवळ पुणे येथे होत आहे. 

कै ताराचंदजी भगवानराव परदेशी-कंचे यांना आपल्याच तरुण गर्जना ह्या परिवाराकडून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पित करत आहोत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध