Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ जुलै, २०२०

स्थानिक गुन्हे शाखा, धुळे चा छाप्यात २,७९,०००/- रू.ची भांग जप्त..!



धुळे प्रतिनिधी :संपूर्ण भारत देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना मागील काही दिवसापासून धुळे शहरात विनापरवाना व बेकायदा कोरड्या भांग ची विक्री होत असल्याची चर्चा चालू असल्याने सदर बाबत माहिती काढून छापा कारवाई करावी बाबतचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत, व अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. राजू भुजबळ, यांनी स्थानिक गुन्हे शाखा, धुळे चे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना दिले होते.

त्यावरून दिनांक- ३०/०६/२०२० रोजी पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना गुप्त बातमीदारामार्फ माहिती मिळाली की, धुळे फागणे रोडवरील सिमेंटचे गोडावूचे पाठीमागे योगेश बाळकृष्ण मेखे (वाणी) यांचे मालकीचे गोडावूनमध्ये सुका भांग बेकायदा विक्री करण्याचे उद्धेशाने साठवून ठेवला आहे. त्यावरून सदर ठिकाणी जाऊन छापा घातला असता योगेश बाळकृष्ण मेखे (वाणी) यांचे मालकीचे गोडावून मनोज ज्ञानेश्वर चौधरी, ६९, अलंकार सोसायटी, अरिहंत भवनजवळ, धुळे व दिपक बाबुराव कुरे, रा. एकता नगर, देवपूर धुळे यांनी भाड्याने घेऊन त्यात ६२ कोरड्या भांगेने भरलेल्या असा एकूण १८६० किलो गोण्या भांग कि.रू. २,७९,०००/-चा ठेवल्याने निष्पण्ण झाल्याने तो जप्त केल्या असून सदर बाबत गुन्हा दाखल करण्यासाठी धुळे ता. पो.स्टे. ला रवाना केला केला आहे.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. धुळे चे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत , पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पो.हे.कॉ. रफीक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, पो.कॉ. राहुल सानप, उमेश पवार,    
रविकीरण राठोड, विशाल पाटील, व चा.पो.कॉ. दिपक पाटील व गुलाब पाटील अशांनी कला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध