Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ जुलै, २०२०

कोविड-19 पार्श्वभूमीवर उस्मानाबाद पोलीस दलाचा एक गाव- एक पोलीस उपक्रम..!



उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.8 जिल्ह्यात कोविड -19 रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यांच्या निर्मूलनात पोलीस-जनता साहचर्य भावना आवश्यक आहे.या द्रुष्टीकोनातून मा.पोलीस अधिक्षक श्री.राज तिलक रौशन यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक गाव-एक पोलीस तर शहरात एक बीट- एक पोलीस संकल्पना राबवली जात आहे.त्यास अनुसरून जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यातील गावांना त्या संबंधीत पोलीस ठाण्यातील किमान एक पोलीस कर्मचारी नेमण्यात आला आहे.

संबंधित गावाचे व नेमलेल्या पोलीसाचे नाव, मो.क्रं यांचा तक्ता संबंधीत पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात लावण्यात आला असून. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामसुरक्षादले,अँटी कोरोना कॅम्प , ग्रामस्थांच्या व्हाट्सअप गटात प्रसारीत करण्यात आला आहे.या उपक्रमाचा चांगला फायदा होत असून गावातील कोविड-19 रोगाशी संबंधीत आवश्यक माहिती प्रशासनास जलद गतीने उपलब्ध होत आहे.

एक गाव-एक पोलीस उपक्रमाची उद्दिष्टे

1)संबंधीत गावात कोविड-19 संसर्ग,संशयीत रुग्ण इत्यादी संबंधी अद्यावत माहिती घेणे.

2)परजिल्ह्यातून विनापरवाना गावात आलेल्या लोकांची माहिती घेणे.

3)राहत्या घरी संस्थात्मक कॉरनटाईन करण्यात आलेल्या लोकांच्या हालचालींची माहिती घेणे.

4) कोविड-19 संबंधि प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशाची गावात यशस्वी अंमलबजावणी करणे.

5) ग्रामस्थ,ग्रामसुरक्षादले,अँटी कोरोना कॅम्पस,ग्रामसेवक, तलाठी,ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभाग यांच्याशी समन्वय  साधून कोविड-19 निर्मूलनाचे काम करणे.

6)एक गाव- एक पोलीस योजनेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली पोलीस ठाण्यातील नित्याची कामे करून सप्ताहात किमान तीन वेळा संबंधीत गावात जाऊन जनसंपर्क साधने अपेक्षीत आहे.

असे उस्मानाबाद जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौशन यांनी विशेष प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.या नव उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे कोरोनाच्या प्रसारासाठी आळा बसू शकेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध