Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात कोरोना चा शिरकाव ४२ वर्षीय महीलेचा अहवाल पॉझिटीव्ह..! गावात चिंतेचे वातावरण..!
शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात कोरोना चा शिरकाव ४२ वर्षीय महीलेचा अहवाल पॉझिटीव्ह..! गावात चिंतेचे वातावरण..!
दोंडाईचा प्रतिनिधी: दिग्विजयसिंग राजपुत
शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात ४२ वर्षीय महीला यांचा अहवाल कोरोना पॉजिटीव दि.७ जुलै २०२० रोजी रात्री उशिरापर्यंत मिळाला गावात चांगलीच धावपळ उडाली ग्रामंस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे रामी येथील रहिवासी ४२ वर्षीय महीलेला कोरोनाची लागण झाली सदरील व्यक्ती दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले होते तर त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांचा अहवाल धुळे येथे पाठवण्यात आला त्यांनतर दि.०७ जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत त्यांचा अहवाल पॉजिटीव आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तसेच दि.०८ जुलै रोजी सकळी १० वाजता पॉजिटीव आलेल्या रूग्णाच्या घरातील सर्व व्यक्तीनां दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले त्यांचे अहवाल येईपर्यंत गावात नागरीकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे रामी येथील महीलेचा अहवाल पॉजिटीव आल्याने रामी गाव १४ दिवस कंन्टेमेंट झोन घोषित कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे परीसर संपूर्ण सील करण्यात आला आहे.
कोरोना केअर सेंटरचे प्रमुख डॉ.हितेंद्र देशमुख यांनी रामी येथे भेट देत परीस्थिती जाणून घेतली पॉजिटीव रिपोर्ट आलेल्यांच्या संपर्कातील ०६ जणांचे अहवाल घेण्यासाठी दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले अहवाल येईपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये असे डॉ.हितेंद्र यांनी सांगितले.
निमगूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने रामी येथील ग्रामस्थांचे आरोग्य तपासणीसह सर्वेक्षणास सुरू केली रामी ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली यासाठी रामी चे युवानेते उपसरपंच कुलदिपभाऊ गिरासे, ग्रामसेवक आर.बी.निकुंभे, सरपंच कड्ड भिल, ग्रा.पं.सदस्य विकास राजपुत तसेच सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रा.पं.कर्मचारी आदिं परिश्रम घेत आहेत.
यावेळी उपसरपंच मा.कुलदिपभाऊ गिरासे यांनी गावकऱ्यांना विनंती केली कि १४ दिवस संपूर्ण गाव कंन्टेमेंट झोन घोषित झाल्याने कोणीही घराबाहेर पडू नये कोरोना जगात होता नंतर देशात आला देशातून राज्यात आला आणि आता आपल्या उंभरट्यावर येऊन पोहचला आहे म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वताचे आरोग्याची काळजी घ्यावी अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये ग्रामपंचायत प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.
तसेच युवा पत्रकार दिग्विजयसिंग राजपुत यांनी रामी ग्रामस्थांना नम्र आवाहन केले की कोणीही १४ दिवस घराबाहेर निघू नये अत्यावश्यक काम असतील तरच घराबाहेर निघा घराबाहेर निघण्याच्या आदि तोंडाला माक्स किंवा रूमाल लावा गर्दी होण्यास टाळा प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासन रात्री दिवस स्वत:चा जीव धोक्यात टाकून आपल्या साठी लढा देत आहेत घाबरू नका सतर्क रहा कोरोना सोबत आपल्याला हरायचे नाही लढायचे आहे आपण करूया कोरोना मुक्त रामी..!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा