Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ जुलै, २०२०

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अरुण वामन टोंगारे (52) रा. वासन नगर यांचे कोरोना मुळे निधन



इंदिरानगर प्रतिनिधी:इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अरुण वामन टोंगारे  (52) रा. वासन नगर यांचे कोरोना मुळे निधन झाले .तीन आठवड्यांपूर्वी त्यांना नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

अरुण टोंगारे हे इंदिरानगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते  लॉक डाउन काळात  प्रतिबंध क्षेत्रात  टोंगारे यांनी कर्तव्य बजावले होते त्यानंतर सुमारे वीस दिवसापूर्वी त्यांची तब्येत बिघडली म्हणून ते रजेवर गेली होते  कोरोना बाधित झाल्याचे लक्षात आले तातडीने त्यांना एका खाजगी रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
 
त्यानंतर त्यांची पत्नी आणि दोघे मुलं देखील बाधीत झाली होती. मात्र उपचारा नंतर ते बरे झाले होते .5-6 दिवसांपूर्वी टोंगारे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले होते. दुर्दैवाने त्यांचा मंगळवार (दि३१) रोजी रात्री साडेआठ वाजता  उपचारादरम्यान मृत्यू झाला.   त्यांच्यावर अंधेरी येथील स्मशान भूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
  
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

टोंगारे च्या रूपातील एक कर्तव्य निपूण आणि भला माणूस इंदिरानगर पोलिस ठाण्याने कोरोना काळात कर्तव्य बजावत असतांना गमावला आहे. त्यांची कमी नेहमी जाणवेल अशा भावना इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध