Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

प्रा. कुंदन हेमंत देवरे यांचा "ग्लोबल बर्डन ऑफ डेंग्यू " हा लेख इंडो अमेरिकन जर्नल ऑफ फार्मासुटिकल रिसर्च मध्ये प्रसिद्ध होणार आहे.



नगाव येथील गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. कुंदन देवरे  यांचा डेंग्यूवरील लेख इंडो अमेरिकन जर्नल ऑफ फार्मासुटिकल रिसर्च मध्ये प्रसिद्ध होणार. 
    
तालुक्यातील नगाव येथील नगाव एज्युकेशन सोसायटीच्या गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. कुंदन हेमंत देवरे  यांचा "ग्लोबल बर्डन ऑफ डेंग्यू " हा लेख इंडो अमेरिकन जर्नल ऑफ फार्मासुटिकल रिसर्च मध्ये प्रसिद्ध होणार आहे.
          
या लेखामध्ये डेंग्यू हा आजार काय आहे, तो कशापद्धतीने पसरतो, त्याची लक्षणं काय आहेत. लक्षण आढळून आल्यावर त्याच्यावर काय उपाय करावेत कुठली औषधी घ्यावी, तसेच त्याला कशापद्धतीने आला घालावा त्याच्यावर काय उपाययोजना कराव्यात, काय खबरदारी घ्यावी जेणेकरून डेंग्यू ह्या आजारावर आपण मात करू शकतो तसेच त्याला टाळू शकतो यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. सध्या कोरोनाचा प्रसार चालू आहेत त्यामुळे दुसऱ्या साथीचे आजार किंवा इतर आजर आपण आपण योग्य काळजी घेऊन टाळले पाहिजेत
     
प्रा.कुंदन देवरे यांच्या या लेखाबद्दल त्यांचे संस्थेचे सचिव बाळासाहेब श्री. मनोहर भदाने, उपाध्यक्षा सौ. ज्ञानज्योती भदाने, अध्यक्ष श्री. रामदादा भदाने, प्राचार्य डॉ. अनिलकुमार टाटिया, उपप्राचार्य डॉ. सुफियान अहमद व सहकारी प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध