Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ जुलै, २०२०
रावेरात सात दिवसांचा जनता कर्फ्यु लागू होणार..!
रावेर प्रतिनिधी अजीज शेख :सोमवार दि.१३ पासून रविवार दि १९ जुलै पर्यन्त बंद करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने सात दिवसाचा जनता कर्फ्यु लावण्याचे प्रशासनाला साकडे घालून विनंती केली असता, सोमवार पासून कडक ‘जनता कर्फ्यु’ पाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.
येथील तहसील कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची पालिकेच्या नगरसेवकांनी भेट घेतली. यावेळी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना होत असताना, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गर्दीला आटोक्यात आणून कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी बुधवारी महत्वपूर्ण चर्चा झाली.यात शहरातील किराणा दुकानासह पेट्रोल पंप सुद्धा बंद
यात सोमवार दि.१३ पासून रविवार दि १९ जुलै पर्यन्त ‘जनता कर्फ्यु’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रसंगी पालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे अधिकारी उपस्थित होते. तर उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन, गटनेते असिफ मोहंमद, ॲड.सुरज चौधरी, यशवंत दलाल, असदुल्ला खा.शारदा चौधरी, कलीम मेंबर,
आयुबखा पठाण यांनी नगरसेवकांच्या सहया असलेले निवेदन दिले. तसेच यावेळी
माजी नगरसेवक शिरीष वाणी सर, ऍड. योगेश गजरे, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना अग्रवाल हे सुद्धा उपस्थित होते,
त्यानुसार जनता कर्फ्यु पाळण्यासाठी प्रशासना कडून हिरवा कंदील मिळाला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा