Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला कडक शासन करण्यात यावे..! वंचित बहुजन आघाडी निवेदनाद्वारे मांगणी..!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला कडक शासन करण्यात यावे..! वंचित बहुजन आघाडी निवेदनाद्वारे मांगणी..!
रावेर दि.८प्रतिनिंधी अजीज शेख: मुंबई - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर आज संध्याकाळी दोन अज्ञात माथेफिरू व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला कडक शासन करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी रावेर, भारिप बहुजन महासंघ, शहर आघाडी, महिला आघाड, युवक आघाडी, शहर आघाडी तहसिलदार, पोलिस निरिक्षक यांना निवेदनाद्वारे मांगणी करण्यात आली आहे.
तहसिलदार उषाराणी देवगुणे, व सहाय्यक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.आणि आमची अस्मिता म्हणजे राजगृह आमचा वारसा म्हणजे राजगृह आमच्या अस्मितेवर भ्याड हल्ला करणाऱ्या मनुवादी बांडगुळ आणि जातीवादी पिलावळ यांचा जाहीर तीव्र निषेद करीत आहोत.
आणि पुरोगामी फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात गेल्या चार पाच वर्षा पासून बौद्ध, ओबीसी, एस.टी.,एन.टी. व्हीजे एन.टी.या सामाज्यावर अन्याय होत आहे तरी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सरकार कठोर शासन करत नाही म्हणून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये दिवसनदिवस अन्याय होत आहे.
आरोपीचा तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी व कठोर शासन करण्यात यावे असे निवेदन रावेर तहसिलदाराना वंचित बहुजन आघाडी रावेर, भारिप बहुजन महासंघ , युवक आघाडी शहर आघाडी, महिला आघाडी यांनी दिले.
दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, ता. उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, ता. सचिव सलीम शाह, ता. सचिव बाळा शिरतुरे, ता . संघटक गौतम अटकाळे, नितीन तायडे, संतोष बिरपनकर, गोकुळ अटकाळे, किसन गाढे, दिलीप पानपाटील, कैलास धनगर,श्रावण पाटील, नरेद्र गाढे किशोर तायडे, किशोर सुरदास .सुकदेव तायडे, अनिल घेटे, राजेश रायमळे, धनराज घेटे, प्रदीप महाजन यांच्या सहया आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा