Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जुलै, २०२०

वन विभागाचे सिंचित रोपवन लागवड प्रयत्नांतून फुलते "नंदनवन'..!



सत्रासेन ता चोपडा सुभाष पाटील:सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या रांगेत वसलेल्या सत्रसेन गावात वन विभागाच्या वतीने अनेर वन्यजीव योजनेअंतर्गत ०५ हेक्टर जमिनीवर वन विभागाच्या वतीने लावलेली दोन हजार रोपटी ही आता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने ही रोपे पाच ते सात फूट उंचीची होवून डोलु लागली आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून अवघ्या तीन वर्षात ही किमया साधली गेली.

वन विभागाच्या कक्ष क्रमांक २७९  येथील ०५ हेक्‍टर जागेवर वन विभागाने अनेर वन्यजीव योजनेअंतर्गत फळझाडे ठिबक सिंचनाद्वारे लागवड केली होती. 

या वर्षी तापमान चाळीशीकडे झुकलेले असतांना भर उन्हाळ्यात मात्र रोपांना पाण्याचे संकट उभे राहिले जास्त तापमानामुळे रोपे देखील कोमावू लागली होती.रोपवणात येणारा विद्युत पुरवठा डी पी जळाल्याने खंडित झाला होता. त्यामुळे तेथील पाणी पंप बोरवेल देखील बंद झाला होता. त्यामुळे रोपांना भर उन्हाळ्यात पाणी मिळणे अशक्य झाले होते व रोपे कोमाजू लागली होती.

रोपांना पाण्याची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत कक्ष क्रमांक २७९ फळबाग येथील वनरक्षक श्रीमती.एस.एस.भोई यांनी रोपांना कोमाजू लागले बघून उपाययोजना करत रोपांना पाणी देण्याचे ठरवले व त्यांनी पाणी टँन्कर च्या साह्याने स्वतः व वनमजुर च्या साह्याने नळी द्वारे पाणी दिले व टँन्कर च्या साह्याने पाणी दिल्यामुळे उन्हाळ्यात रोपे मृत पाहू शकले नाहीत व आता पावसाळा लागल्यामुळे ती वनराई अगदी हिरवीगार व एखाद्या पर्यटन स्थळासारखी फुललेली दिसून येत आहे. 

बाजूला अनेर नदी वाहत आहे. निसर्गरम्य वातावरणात एखाद्या घनदाट जंगलात प्रमाणे या ठिकाणी वातावरण वनविभागाच्या ठिबक सिंचनाच्या प्रयत्नांमुळे झालेले दिसून येत आहे त्या ठिकाणी सर्व फळझाडे आहेत.

आंबा,सीताफळ,भोकर,चिंच,आवळा,  जांभूळ,हिरडा,बेहडा,पिंपळ,उंबर ही झाडे पाच हेक्टर क्षेत्रामध्ये ठिबक सिंचनाद्वारे लावलेली आहेत.

अशाप्रकारे सिंचनाद्वारे झाडे लावली तर निसर्ग बदलायला वेळ लागणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध