Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ जुलै, २०२०

खिर्डी बुद्रुक ला कोरोनाचे ग्रहण..!एक महिला,एक पुरुष पॉझिटीव्ह..!



दि.९ ते १३ कडकडीत पाच दिवसांचा जनता कर्फ्यु फक्त दवाखाने ,मेडिकल,दूध डेअरी ,किराणा सुरु राहतील....

खिर्डी प्रतिनिधी(प्रदीप महाराज)दि.९खिर्डी बुद्रुक आतापर्यंत कोरोना मुक्त असलेले गाव हे कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे.गावात कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आज दि.९ रोजी पासून पाच दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद राहणार असून सर्वांनी सहकार्य करावे व बंद यशस्वी करावा असे कोरोना समिती व ग्रामपंचायत तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील दि ९ रोजी दोन कोरोना बाधित रुग्ण आढल्याने गावात एकच खळबळ उडाली.महत्वाचे म्हणजे खिर्डी गाव बरेच काळापासून कोरोना मुक्त होता मात्र खिर्डी ला ही कोरोनाचे ग्रहण लागले आहे.

यात खिर्डी बुद्रुक येथील आंबेडकर नगर येथील एक ४८ वर्षीय पुरुष तर बेघरवस्ती परिसरातील एक ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून कोरोना बाधित महिला ही खिर्डी बुद्रुक येथील रहिवासी असून ती गेल्या तेरा दिवसापासून यावल तालुक्यातील अंजाळे येथे अंतयात्रे साठी गेली असता त्या ठिकाणी त्या महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिच्या संपर्कातील खबरदारी म्हणून एकूण पाच जणांना तर बाधित पुरुष याच्या संपर्कातील चार संशयित जणांना कोविड सेंटर ला कौरंटाईन करण्यात आले आहे खिर्डी येथील ४८ वर्षीय पुरुष  व ५५ वर्षीय महिला  या व्यक्तीची तब्येत बरोबर नसल्याने गेल्या तीन ते चार दिवसापासून त्याला आरोग्य औषध उपचारासाठी जळगाव सिव्हिल हास्पिटलमध्ये दाखल केले असता स्वब घेण्यात येऊन त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची बातमी रावेर तालुका अधिकारी डॉ. शिवराय पाटील व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पाटील यांनी दिली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्या नन्तर लागलीच पॉझिटीव्ह असलेल्या  व्यक्तीच्या घराजवळील परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आलेसदरहून दोन पैकी एक कंटेंटमेंट झोन घोषीत करण्यात आले असून संबंधित परिसर आरोग्य विभाग तसेच ग्राम पंचायत प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. 

कंटेन्मेंट झोन मधील २० घरांचा समावेश असून १४ दिवस घराबाहेर निघू नये असे आवाहन आरोग्य केंद्राचे अधिकारी व ग्रामपंचायत तर्फे आवाहन करण्यात आले आहे.     

प्रशासन वेळोवेळी करतेय आवाहन...

खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायत ,आरोग्य केंद्र व पोलिस प्रशासनाने सर्वांनी मास्कचा  वापर करावा,डिस्टन्स ठेवावे,विनाकारण न फिरता घरातच राहावे  अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.

कोरोना समितीचा निर्णय

फक्त दवाखाने,मेडिकल,दूध डेअरी,सुरू राहणार  कोरोना महामारीमुळे बिकट परिस्थिती असताना देखील फिजिकल डीस्टिंगचे पालन अजिबात केले जात  नाही.कोरोना ची साखळी तोडण्यासाठी खिर्डीत जनता कर्फ्यु दि.९ ते १३ पाच दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.या बाबत ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक,पोलिस पाटील ,तंटामुक्ती समिती,पत्रकार संघटना,नागरिक कोरोनाच्या वाढत्या महामारीच्या संकटाला कसे थांबवता येईल यावर विचारविनिमय करण्यासाठी बैठक झाली त्यामध्ये निर्णय घेण्यात आला.या काळात फक्त दवाखाने, मेडिकल दूध डेअरी,किराणा ,जनता कर्फ्यु काळात फक्त सुरू राहतील.बाकी सर्व दुकाने भाजीपाला,मोबाईल दुकाने,व इतर सर्व दुकाने ५ दिवस बंद राहतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध