Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सनराइज् पदग्रहन संपन्न..! अध्यक्ष पदी युवानेते कुलदिपभाऊ गिरासे यांची निवड..!
रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सनराइज् पदग्रहन संपन्न..! अध्यक्ष पदी युवानेते कुलदिपभाऊ गिरासे यांची निवड..!
दोंडाईचा प्रतिनिधी:दिग्विजयसिंग राजपुत
रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सनराइज् यांचा सातवा पदग्रहण दिनांक ०३ जुलै २०२० शुक्रवार रोजी व्यापारी भवन दोंडाईचा या ठिकाणी संपन्न झाला.०१जुलैपासून रोटरी क्लबचे नविन वर्ष सुरू होते,
या नवीन वर्षासाठी अध्यक्षपदाची धुरा रामी गावचे पाणीदार सरपंच युवानेते रो कुलदिपसिंह गिरासे यांनी व सचिव पदाची कार्यभार रो महेंद्रसिंह गिरासे यांनी स्वीकारले नूतन अध्यक्ष यांनी येणाऱ्या वर्षात covid-19 या महामारीच्या उपाय योजना संदर्भात व महामारी नंतर उद्भवणाऱ्या विविध अडचणींवरती प्रोजेक्ट करण्यायासंदर्भात मानस व्यक्त केला.
तसेच रोटरी च्या फोकस एरिया नव्याने समाविष्ट झालेल्या पर्यावरण या विषयावर दोंडाईचा शहराच्या पंचक्रोशी मध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे सांगितले. सदर पदग्रहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रो. डॉ रवींद्रनाथ टोणगावकर हे होते, त्यांनी रोटरी संदर्भात जग व भारतातील रोटरी याबाबत त्यांचे विचार मांडले व सर्वांनी service above self या युक्ती वर काम करण्यासाठी आवाहन केले.
नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाची शपथ रो श्रीकांतजी इंदानी यांनी दिली. रो इंदानी यांनी सनराईज क्लब हा युवाशक्तीचा क्लब असून आपले आयडिया व आपले क्षमता परी पूर्णपणे वापरून आपल्या शहरात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी काम करतील अशी आशा केली सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रो हिमांशू शहा व रो अनिष शहा हे ही उपस्थित होते. मावळते सचिव रो. सुरेंद्र गिरासे यांनी मागील वर्षातील घेतलेल्या विविध उपक्रमांची ची माहिती दिली, तसेच मावळते अध्यक्ष निळकंठ पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सद यशस्वीतेसाठी रो. प्रफुल शिंदे, रो अमित चित्ते, रो जयसिंग गिरासे, रो ऋषिकेश बोरसे, रो संजय धनगर, रो शैलेश बोरसे, रो नरेंद्र बाविस्कर, रो अमर थोरात, रो रोहन गिरासे, रो महेंद्र शिंदे, रो मनीष कुकरेजा रो बलराम कुकरेजा, रो जयराम पाटील, रो सचिन वाडीले, रो विजय संदांशिव, व नवीन सदस्य रो अक्षय गिरासे आदींनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. अॅड.जतीन वाघेला यांनी केले.
सदर पदग्रहण साठी सोशल डिस्टिंग सेनी टायझर व मास्क वापर करण्यात आला नूतन अध्यक्ष सचिव व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा