Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ जुलै, २०२०

मुख्यमंत्री,अन्न पुरवठा व पालकमंत्री यांचाकडे मागणी..!



कोरोनाच्या काळात मोफत वाटप करण्यात
आलेल्या स्वस्त धान्याचे कमिशन दुकानदारांना मिळावे..!भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी..!

शिरपूर : शिरपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याची दुकाने असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकार कडुन येणारे सर्व धान्य वितरणाची जबाबदारी तालुक्यातील स्वस्त धान्य विक्रेत्यांवर देण्यात आलेली होती. 

आतापर्यंत ३ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील त्यांना त्यांचे कोणतेही कमिशन अद्याप मिळालेले नाही. दुकानदारांना कमिशन मिळावे अशी मागणी शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात देखील दुकानदारांनी त्यांचा जीव धोक्यात घालून धान्य वितरणाची जबाबदारी पार पाडली आहे. 

तसेच नियमित वितरणात मिळणारे कमिशन देखील थोडके असून त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांना (दि. 5 जुलै) रोजी ईमेलने पाठवलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनाची प्रत विधानसभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ, जिल्हाचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांना हि पाठवण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात मोफत वाटप करण्यात आलेल्या स्वस्त धान्याचे कमिशन तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना मिळावे व नियमित धान्य वितरणात मिळणारे कमिशन वाढविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी हि भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ व पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध