Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ जुलै, २०२०

रामचंद्र येशी यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती..!


शिरपूर प्रतिनिधी विजय महाले ता ७ : शहर नाभिक दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष रामचंद्र रतीलाल येशी यांची न्यू दिल्ली मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या धुळे जिल्हा (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता यांनी ही नियुक्ती केली आहे.

पूर्ण भारतात असलेल्या न्यू दिल्ली येथील  मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची जबाबदारी शिरपूर येथिल रामचंद्र येशी यांना देण्यात आली आहे. या बाबत राष्ट्रीय संस्थापक कार्याध्यक्ष तथा महासचिव दिनेश गुप्ता, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ आशिष परमार, कोषाध्यक्ष डॉ जितेंद्र गुप्ता, वित्तीय सल्लागार नितेश सिंह, जगन्नाथ पाटील, दिनेश यादव, सचिव उदयलाल गुप्ता, उपसचिव उमेश शिंदे, संतोष भोईर, डॉ चंदन शर्मा, रवी गुप्ता, महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्ष शोभाताई जाधव, शिरपूर जनकल्याण सेवाभावी संस्थाचे विकास सैन यांनी अभिनंदन केले, समाधान व्यक्त केले.

रामचंद्र येशी यांनी संघटनेच्या पदाधिकारी सोबत कोरोनाच्या संचारबंदी काळात शिरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सेवाभावी कार्य केले. गरजवंत सामाज बांधवांना अपेक्षित मदत पोहचवली, परराज्यात  पायी जाणाऱ्या अनेक लोकांना बिजासन घाटात मदत केली. त्यांच्या या कामाची दखल अनेक सेवाभावी संस्थानी घेऊन त्यांना प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन यथोचित सत्कार केला. 

यात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट सातारा, साई निर्मल फाउंडेशन भुसावळ, भारतीय किसान युनियन लोकशक्ती हरियाणा, कौशल विकास आणि उद्यमिता मंत्रालय नई दिल्ली, आयुष संजीवनी, केंद्रीय सतर्कता आयोग नई दिल्ली, सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रीय हिंदू संघ अशा विविध संघटनानी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. 

श्री येशी यांना धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडी बद्दल सर्व स्तरातून श्री येशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 
छायाचित्र : रामचंद्र येशी, शिरपूर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध