Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
उस्मानाबादच्या राजेश पाटोळे यांच्या 'पतंग' ला मिळाला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार..!
उस्मानाबादच्या राजेश पाटोळे यांच्या 'पतंग' ला मिळाला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार..!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि7जिल्ह्यातील गणेगाव हे गाव राजेश पाटोळे यांचे गाव जेमतेम लोक संख्या गावात सातवीपर्यंत शाळा आशा गावात आपले बालपण घालवणारे राजेश यांना चित्रपटांची सुरुवातीपासुनच आवड होती.म्हणुन ते खास शुटींग बघण्यासाठी गेले आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.व चित्रपट नगरीच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली.त्यांनी या प्रवासा दरम्यान कॅमेरामन ते दिग्दर्शना पर्यंत लहान मोठ्या भुमिका बजावल्या आहेत.
राजेश पाटोळे यांच्या पतंग या सामाजिक चित्रपटासाठी लेखन,
पटकथा,सिनेमॅटोग्राफी,दिग्दर्शन करताना ग्रामीण भागातील निर्माता यांची मदत घेऊन चित्रपट तयार करण्यात आला आहे.व पतंग या मराठी चित्रपटास दादासाहेब फाळके गोल्डनसह कॅमेरा पुरस्कारा सह आनखि पुरस्कार प्राप्त झाली आहेत.
तसेच या चित्रपटास सामाजिक विषयांवरील सर्वोत्तम चित्रपट म्हणून अंतरष्ट्रीय स्तरावरील संस्थे कडून पुरस्कार जाहीर झाला आहे.निर्माते अनिल दगडे यांची ही पहीली चित्रपट निर्मिती असून देखील त्यांनी. पतंग चित्रपट निर्मिती करताना कसलंही कसर ठेवली नाही व त्याचा माणस आहे कि आरती फिल्म्स निर्मित सामाजिक विषयावरील चित्रपट निर्मिती करत राहणे.
सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर (शेलगाव वांगी) येथील शेतकरी कुटुंबातील अनिल दगडे यांचे सामाजिक विषयांवर चित्रपट काढण्याचे स्वप्न होते.अशातच राजेश पाटोळे यांची त्यांच्यासी ओळख झाली. त्यांची कथा राजेश यांना आवडली मग राजेश पाटोळे यांच्या दिग्दर्शनाखाली पतंग चित्रपटाच्या निर्मितीच्या कमास सुरूवात झाली.व लॉकडाऊनच्या पुर्वी पतंग पुर्ण झाला.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुमीवर त्यास प्रदर्शित होण्याच्याचे भाग्य लाभले नाही. राजेश पाटोळे यांचा जीवन प्रवास संघर्ष करत एका चित्रपटाच्या सेटवर सहभागी झाले आणि स्टील फोटोग्राफर म्हणून त्यांची एक संघर्षमय सुरूवात झाली होती. सतत प्रयत्न, नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा, तंत्रज्ञान माहिती करून घेण्याची जिज्ञासा, त्यांच्यात असलेली कॅमेरामन व दिग्दर्शकाची दुरदृष्टी यामुळे एका बहुजन वंचीत समाजातील युवकाने आपले गाव सोडून शहर गाठले.सीनेमॅटोग्राफी व दिग्दर्शन क्षेत्रात आपला ठसा उमटविला.
मराठी पतंग या चित्रपटाला ज्युरी मेंशन बेस्ट फिल्म, उत्करष्ठ चित्रपट, बेस्ट अॅक्टर, बेस्ट स्पोर्टी ग अॅक्टर, चाईल्ड अक्टर, बेस्ट स्टोरी_स्क्रीन,बेस्ट सीनेमॅटोग्राफरसाठी दादासाहेब फाळके जन्म भुमी पुरस्कार २०१९ साठी निवड झाली व नामांकन मिळाले आहे. तसेच या चित्रपटातील कलाकार, संगीतकार, गीतकार, यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे. यात बरेच हौसी होतकरू कलाकार त्यांना मिळत गेले. यामध्ये जेष्ठ कलाकार मिलिंद शिंदे, पंकज विष्णू, मॄणाल कुलकर्णी, अक्षय पंडागळे, तेशवानी वेताळ, गीतकार दिपक गायकवाड, संगीतकार मनोज टिकारीया, पार्श्वगायक आदर्श शिंदे, ज्ञानेश्वर मेश्राम, नेहा राजपाल आदि आहेत.
.
प्रतिक्रिया :१ (राजेश पाटोळे, दिग्दर्शक ) समाजातील चांगल्या लोकांची साथ मिळाली. यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो. अशी नम्र भावना त्यांनी व्यक्त केली. येथुन पुढे ही सामाजिक विषयांवरील प्रेरणादायी चित्रपट तयार करणार आहे. प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यास सामाजिक विषयांवरील चित्रपट तयार होतील. व कलाकारांना प्रेरणा प्रोत्साहन मिळेल. मी माझ्या कडे येणाऱ्या तरूणांना सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शन,आणि एडीटींग प्रशिक्षण दिले आहे. व यापुढेही देत रहाणार आहे.
प्रतिक्रिया :२ (संजय धेण्डे, चित्रपट समीक्षक ) एका वंचित समाजाचा विषय घेऊन सामाजिक बांधिलकी जपत आहे याबद्दल धन्यवाद.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा