Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
जामनेर तालुक्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर व प्रशासनाची सभा संपन्न...!
जामनेर तालुक्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर व प्रशासनाची सभा संपन्न...!
जामनेर: प्रतिनिधी संजय सुर्यवंशी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन तालुकाभरातील प्राथमीक आरोग्यकेंद्राच्या ठिकाणी व गांवपातळीवर शिबीरे (कॅम्प) आयोजीत करण्यात येणार असल्याचे प्रान्ताधिकारी दिपमाला चौरे यांनी येथे सांगीतले. जामनेर तहसील कार्यालयामधे तालुकाभरातील खाजगी-सरकारी डॉक्टरांसोबत एक व्यापक सभा घेण्यात आली.त्या सभेला प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी तालुकाभरातील डॉक्टरांसह तहसीलदार अरूण शेवाळे,पालीका मुख्याधीकारी राहुल पाटील,नोडल अधीकारी डॉ विनय सोनवणे,डॉ आर के पाटील,गटविकास अधिकारी एन. आर.पाटील,डॉ. हर्षल चांदा आदी मान्यवर उपस्थित होते.
गावा-गांवातील अन्य आजाराचे लक्षण असलेल्यांनी कोवीड चाचणी ही जास्तीत-जास्त नागरीकांनी करून घ्यावी,पॉझीटीव्ह रूग्णांवर लागलीच आवश्यक उपचार सुरू करण्यात येतील,त्यासाठी कोणीही घाबरूण जाण्याचे कारण नाही असे ही आवाहन प्रान्त अधिकारी यांनी केले.
गांवातील सरपंच,पोलीस पाटील आदी पदाधीकाऱ्यांचीही बैठक घेऊन त्यांचेही सहकार्य घेण्यात येईल,त्यासाठी त्या त्या ठिकाणी प्रशासनाकडुन विवीध उपाय-योजनांची अंमलबजावणी आणी साहीत्य पुरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
प्रान्ताधिकाऱ्यांशिवाय तहसीलदार शेवाळे,तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे आदींनिही आयोजीत सभेला तालुक्यातील शिबीरांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा