Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

दुसरबीड येथील राम भक्तांना केले फोटोचे पूजन..!


सिंदखेड राजा ( तालुका प्रतिनिधी ) दि.५              
सिंदखेडराजा तालुक्यांमधील दुसरबीड येथील पंधरा ते वीस  श्रीराम भक्तांनी एका खुर्चीवर श्रीरामाच्या फोटोची स्थापना करून सर्वांनी पूजन केले. 
               
या कार्यक्रमासाठी गावातील बरेच राम भक्त नागरिक उपस्थित होते. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी हातामध्ये पूजेचे ताट घेऊन फोटोचे पूजन केले. अनेक वर्षापासून ची प्रतीक्षा संपली.आणि आयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली यामुळे गावातील सर्व रामभक्त उत्साहात होते या कार्यक्रमासाठी रामभक्त सुभाष मखरीचे, प्रल्हाद शिंदे, गजानन पिछोरे, सुनील धबधुले,योगेश जायभाये, गजानन डाखोरकर, साहेबराव चिरफडे, नानाभाऊ तौर,उमेश घुगे,रमेश झोरे .असे बरेच राम 
भक्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध