Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०
ज्योति भोई आत्महत्या प्रकरणी कारवाईची मागणी...!अष्टेकर यांनी दिले निवेदन..!
अहमदनगर:प्रतिनिधी जळगाव जिल्हयातील अंमळनेर येथील ज्योती भोई यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख व भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी सदस्या स्मिता अष्टेकर व रेखा जरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भोई यांनी मला (स्मिता अष्टेकर) फोन करून नगर शहरातील एका पोलिस अधिकार्याची व एका महिलेच्या प्रेम प्रकरणाची माहिती सांगितली व ते आपल्यास त्रास देत असून ते दोघे माझी (ज्योती भोई) सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी करीत आहेत.
या बदनामीमुळे जीवन जगणे अवघड झाले आहे, असे त्यांनी सांगितले होते. संबंधित पोलिस अधिकार्यांनी अंमळनेर येथील एका मागासवर्गीय महिलेस हाताशी धरून माझ्यावर (भोई) खोटा गुन्हा दाखल केला आहे, असेही त्यांनी सांगितल्याचे अष्टेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
ज्योती भोई यांनी माझ्या (अष्टेकर) यांच्या मोबाईलवर (व्हॉटसअॅपवर) त्यांना त्रास देणार्या व आत्महत्येस प्रवृत्त करणार्यांच्या ऑडिओ क्लिप, बदनामीकारक मेसेजस्चे स्क्रीनशॉट तसेच अधिकार्यांना दिलेले निवेदन आदी सर्व बाबी सीडीमध्ये सेव्ह करून पाठपुराव्यासाठी निवेदनासमवेत देण्यात आले आहे.
तसेच फेसबुकवर ज्योती भोई यांची बदनामी करणारांचे स्क्रीनशॉट निवेदनास जोडले आहे. ज्योती भोई यांना न्याय मिळावा, अशी मागणी अष्टेकर यांनी केली आहे. भोई यांच्याविषयी सोशल मिडियावर (फेसबुक, व्हाट्सअॅप) अश्लिल मेसेजेंस् पाठवून त्यांची बदनामी करण्यात आली, ही बदनामी करताना गलिच्छ भाषेत मेसेज पाठवून करण्यात आली.
संबंधित भोई यांना त्यांच्या मोबाईलवर धमक्याही देण्यात आल्या. त्यामुळे त्यांनी जळगाव येथील पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. परंतु पोलिस अधिकार्यानी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असा दावाही अष्टेकर यांनी या निवेदनात केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा