Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०
एक ' पीआय ' करतोय अमळनेरच बिहार...भुमीपुत्र आहात कुठे ?
पोलीस दलातील सडका 'आंबा' बाहेर फेकल्याशिवाय, कायदा सुव्यवस्थेचा 'मोर' फुलणार नाही...
अमळनेर : सामाजिक कार्यकर्ता ज्योती भोई यांची आत्महत्या की हत्या ? हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. ज्योती भोईची सुसाईड नोट गेली कुठे ? ज्योती भोईला अमळनेर पोलीस प्रशासनातील कोणता अधिकारी त्रास देत होता ? त्यामुळे ज्योती भोईला आत्महत्या करावी लागली का ? ज्योती भोईचं फेसबूक अकाऊंट तिच्या आत्महत्या-हत्येपूर्वी डिलीट कसं झालं , ते कुणी करून घेतलं की,ज्योती भोईने केलं ? हे सर्व प्रश्न जरूर सुटतील...कारण ज्योती भोईने अनेक निकटवर्तीय, मित्रांना आपली व्यथा फोन करून सांगितली होती.
आजही त्या ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. एवढंच काय फेसबूक प्रिन्टस्कॅन देखील आहेत. ज्योती भोई आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, तत्पूर्वी पुराव्यांच्या आधारावर संबंधित अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त किंवा हत्या जे सक्षम पुरावे असतील त्या आधारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण काही स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अमळनेरचा कायदा आणि सुव्यवस्था आज असुरक्षित हातात आहे.
राज्यात गृहमंत्री राष्ट्रवादीचे असले तरी भुमीपुत्र आमदार अनिलदादा यांना गुन्हेगारी प्रवृत्ती नांगर टाकून उखडून फेकता येत नाहीय.आजही जिल्ह्यातील पिस्तुल्याची जादू कायम आहे .त्यामुळे सत्ता कुणाची हा प्रश्न जनतेसमोर आहेच . दुसरीकडे माजी आमदार शिरीषदादांना महिला आघाडीची कार्य़कर्ता म्हणून साथ देणाऱ्या ज्योती भोईंना न्याय देण्यासाठी ते पुढे येताना दिसत नाहीयत.या सर्व प्रकरणावरून कार्यकर्त्यांच्या जिवाच मोल राजकीय नेत्यांना नसल्याच दिसून येत आहे.
जळगावच्या बालसुधारगृहात या अमळनेरच्या अधिकाऱ्याने अल्पवयीन बलात्कार पीडितीचे जबाब बदलवण्याचा प्रयत्न केला आहे, हे तरी पिडीत कुटुंबाच्या हातील लागलेल्या संबंधित ऑडिओ क्लिपवर दिसून येत आहे.अमळनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात ती बालसुधारगृहात आहे, या प्रकरणी आरोपी महिना उलटला तरी फरार असून तो सापडत नसल्याचे चित्र पोलीस प्रशासनाने निर्माण केले आहे . मात्र सुधारगृहात जबाब घेतांना तिची दिशाभूल करून, आरोपीला जामीन मिळवण्याच्या दिशेने जबाब घेण्याचा प्रयत्न झाल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
ही पीडिता तिच्या सासूशी फोनवरून संवाद साधत असताना ही क्लिप रेकॉर्ड झाली आहे. दुसरीकडे बालसुधारगृहात ज्या सासू सासऱ्यांनी सुरक्षितता म्हणून तिला तिथे पोहोचवलं, त्या सासू सासऱ्यांना बालसुधारगृहाचे अधिकारी भेटू देत नाहीयत. यांना पाकिटं पोहोचल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
एकंदरीत अमळनेरची कायदा आणि सुव्यवस्था धोकादायक हातात आहे, तुमच्यावर ,तुमच्या आई-बहिणीवर अन्याय झाला तरी देखील आज तुम्हाला न्याय मिळणार नाही,अशी परिस्थिती आहे.
पोलीस दल यातून जरुर मार्ग काढेल, असा विश्वास जनतेला आहे,कारण पोलीस दल आपल्यातील सडके आंबे बाहेर काढून फेकायला वेळ लागू देत नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा