Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

राज्यस्तरीय " कलारत्न " पुरस्काराने प्रभाकर वखरे सन्मानित..!



सिंदखेड राजा ( राजे शशिकांत जाधव ) ता.प्रतिनिधी दि १७ मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई. यांच्या वतीने दि.१६ अऑगष्टारोजी सिंदखेडराजा तालुक्यातील  किनगाव राजा पासून पाच किलोमीटर आंतर असलेल्या उमरद येथील नागरिक श्री.प्रभाकर वखरे यांना सन 2020चा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार ऑनलाइन झूम ॲप द्वारे देऊन सन्मानित करण्यात आले आहे.                                      

उमरद हे एक छोटे गाव असून त्या गावांमध्ये त्यांची प्रभाकर वखरे पेंटर म्हणून ओळख आहे.तसेच महाराष्ट्राच्या विविध संस्कृती असणार्‍या पैकी कोल्हापुरी फेटे बांधण्याच्या कलेमध्ये ते पारंगत असून जिल्ह्यामध्ये त्यांना सर्व जण ओळखतात
                
वखरे यांनी  चित्रपट अभिनेते अभिनेत्री तसेच सामाजिक कार्य व राजकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री,राज्यातील विविध मंत्री,आमदार,खासदार, यासारख्या अनेक मान्यवरांना शोभतिल असे डौलदार कोल्हापुरी फेटे बांधलेले आहे.                          

त्याचप्रमाणे सुशोभित रंगरांगोळी नाट्य वेशभूषा, रंगभूषा केले आहेत .छत्रपती शिवराय, शिवपुत्र संभाजी या  ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण केले                              
राष्ट्रसंत गाडगेबाबा, महात्मा गांधी,भारतमाता यांच्या भूमिका साकारल्या आणी सर्वधर्म, समभाव, स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देऊन समाजामध्ये जनजागृतीचे कार्यही आपल्या कलेव्दारे  केलेले आहे.                                               
बुलढाणा फिल्म सोसायटीच्या वतीने 20 जानेवारी 2020 ला  वखरे यांना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांची यात सन्मानाची दखल घेऊन मुंबई येथील अकादमीने त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली.                                                                

परंतु कोरोना संसर्ग मुळे सार्वजनिक  ठिकाणी जाहीर कार्यक्रम न घेता ऑनलाइन पद्धतीने झूम ऍपद्वारे महासंमेलन आयोजित करून वखरे यांना हा पुरस्कार देण्यात आला.                                                                                           
यावेळी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे व राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.केशव महाराज व संस्थेच्या ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभाकर वखरे सह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना ७१ मानकऱ्यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.अशी माहिती वखरे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध