Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

उत्सव गणराया गणेशाचा...!




ओंम गणेशाय नमः !!! आराध्य दैवत तसंच सर्व गणेश पूजनीय भक्तांचं दैवत गणाधीश गणनायक गणपती. उत्सव येऊ घातलाय त्या निमित्त थोडं.. तसं पाहिलं तर घरगुती गणेश उत्सव पूर्वापार चालत आलेली परंपरा. इंग्रज पारतंत्र काळात लोकजागृतीसाठी सार्वजनिक गणेश उत्सव सुरवात झाली. 

मुळ उद्देश्य लोकजागृती समाजप्रबोधन माध्यम. पण स्वातंत्र्यानंतर त्याच स्वरूप  बदललं काळानुसार. सध्या आलेलं कोरोना महामारी संकट त्यावर उत्सव साजरा करण्यावर सावट आलं, उत्साह मनात ठेवून सरकारी आदेश पालन करून सार्वजनिक गणेश उत्सव आता थांबवण्याची, कमी करण्याची वेळ आलीय, ती आता पाळली, अंगिकारली पाहिजे आता. 

सार्वजनिक उत्सवातून उत्साह निर्माण होतो हे जरी खरं असलं तरी अलीकडे अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर नाचून उत्साह निर्माण होण्यासाठी उत्सव साजरा केला जातो. मुळ उद्देश्य बाजूला पडला, पडत चाललाय असंच वाटतं. काही गणेश भक्त मंडळ खुप चांगलं पण कार्य करतात पण ती थोडीच हाताच्या बोटावर मोजता येतील एवढं उरलीत. घरगुती मूर्ती स्थापन करून त्याची पूजा, अर्चना यास प्राधान्य देण्याची योग्य वेळ चालून  आली, तिचा फायदा घेऊ. आपला देव आपला उत्साह आपण साजरा करू अत्यंत साध्या पद्धतीने देव कार्य साध्य करू.  

वाटतं आपल्या प्रत्येकाच्या देवघरात देव्हाऱ्यात  अंनत काळा पासून गणपती मूर्ती असते आहे. तिचे  पूजन होतं असतं करतं असतो पूर्वज पासून चालत आलेली परंपरा आपला देव सुख, संपत्ती,   

बुद्धीदायक आध्य पूजनीय गणराया आपण मानतो.  तसं पाहिलं तर सर्व धर्मात ते पूजन करतं असलेले मानत असलेले देव मग ते कोणतेही असो जळी स्थळी काष्टी पाषाणी आहेत  तर मग असे  सार्वजनिक ठिकाणी पूजन पूजा अर्चना केल्याने पावत असतील तर घरातील देव देवघरातील देव का पावणार नाहीत. आपण त्यांना त्या पद्धतीने नित्य नियम पुजले तर आपल्या साऱ्या इच्छा आकांशा नक्की पूर्ण होतील माझी शंभर टक्के खात्री आहे . घरातल्या देवा कडे नवस बोला मागणी करा तो सर्व प्रथम आपल्याला फळ देईल. ज्यांची पूजा नित्यनियमाने आपण करतं असतो. बाहेर शोधतो तश्याच श्रद्धेनं त्याकडे पाहिलं तर कुठंच जायची गरज पडणार नाही. त्यास शोधण्यासाठी बाहेर पडणं कुठल्या यात बसतं.असं मला वाटतं.  

देव आपल्यात स्वतःमध्ये सुद्धा आहे असं म्हटलं जातं मग सार्वजनिक ठिकाणी आता पूजनाचा अट्टहास सोडला पाहिजे गणेश भक्तांनी  असं वाटतं. गणपती नव्हे तर दुर्गादेवी उत्सव सुद्धा घरगुती झाला पाहिजे. तसंच ईतर धर्मियांनी सुद्धा सार्वजनिक उत्सवास त्यातील उत्साह आता कमी केला पाहिजे. देव देव्हाऱ्यात नाही मंदिरात नाही आपल्यात हवा त्यास प्रथम आपल्यात शोधलं पाहिजे कुठं जाण्याची गरजच नाही. भक्त पुंडलिक यांनी कुठे मंदिरात देव शोधला उलट देव त्यास शोधत घरी आलेत. देवाला पण विटेवर उभ केलं त्यातून बोध हाच अशी नित्सिम भक्ती आपल्यात निर्माण झाली कि देवत्व देव आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्या सदैव तत्पर राहतील आहेत. 

हे नुसतंचं  गणपती उत्सव साठी नाही तर सर्व जातीधर्मातील लोकांनी आता आपला आपला देव आपल्यात शोधला पाहिजे. आपल्या घरात शोधू सृष्टीत प्राणीमात्रात शोधू  त्यास घरी आणू अशी निस्सीम भक्ती करू मग ईश्वर,अल्लाह,येशु सर्वांना सन्मती  देईल देवो .
"श्रद्धा असावी निर्मळ,  
मन असावं प्रेमळ,
 प्राणिमात्रा विषयी कळवळ, 
रिक्त नसणार ओंजळ".....    

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव. 
9922239055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध