Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

शेगाव नगर परिषदेच्या वतीने धडक अतिक्रमण हटाव मोहीम शहरात राबविण्यात आली..!



शेगावात नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने शहरातील विविध भागात धड म्हणून  अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. सदर अतिक्रमण हटाव मोहिमेला नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली होती. यामध्ये शेगाव नगर परिषद पासून ते शिवाजी चौक आठवडी बाजार परिसरात व आधी परिसरामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. सदर मोहिमेने मुढे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. 

रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांनी मुळे नागरिकांना रहदारीत वारंवार अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. 

सदर बाब ही नगरपरिषद प्रशासनाच्या लक्षात येताच मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या आदेशाने नगर परिषद च्या कर्मचाऱ्यांच्या वतीने व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध